TET Scam: परभणी जिल्ह्यातील अपात्र शिक्षकांचे पगार रोखण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

टीईटी गैरप्रकारात अपात्र असलेल्या शिक्षकांविरोधात कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
Parbhani TET Exam Scam
Parbhani TET Exam ScamSaam TV

परभणी: शिक्षक पात्रात परीक्षेमधील गैरप्रकारात (TET) अपात्र ठरलेल्या परभणी जिल्हातील (Parbhani District) जवळपास ४८ शिक्षकाचे ऑगस्ट महिन्याचे वेतन न देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी काढले आहेत. या शिक्षकांची (Teacher) नावे ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून वगळून अन्य कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची तयारी करावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टीईटी गैरप्रकारात अपात्र असलेल्या शिक्षकांविरोधात कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे आता अपात्र शिक्षकाचे धाबे दणालेले आहेत. या कारवाई अंतर्गत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शिक्षकांचे पगार थांबवण्यात आले आहेत.

पाहा व्हिडीओ -

२०१९ मधील शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Scam) गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर जवळपास ७ हजार ८७४ उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यापैकी ५७६ उमेदवार आजही विविध शाळामध्ये कार्यरत असल्याचे समोर आलं आहे. या ५७६ उमेदवारांचे शालार्थ आयडी शिक्षण संचलन संचालनालयाने गोठवले आहेत. तसंच त्यांचे वेतन ऑगस्टपासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी जिल्ह्यातील शिक्षकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

लातूरमधील शिक्षकांवरही कारवाई -

परभणी पाठोपाठ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारणामध्ये लातूरमधील (Latur) १४ सहशिक्षकाचे ऑगस्ट २०२२ पासूनचे वेतन पुढील आदेशापर्यंत बंद करण्याबाबत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या (मा.) अधिक्षकांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता संबंधित शिक्षकांचे पगार होणार नाहीत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com