Buldhana : धनुष्यबाण चोरीला गेला, शोधून द्या; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं, ठाकरे गटाचा नेता काय म्हणाला बघा?

ठाकरे गटाच्या एका नेत्याने पोलिसात धाव घेत धनुष्यबाण चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.
Buldhana News
Buldhana News Saam Tv

संजय जाधव

Buldhana News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्ष नाव शिवसेना व चिन्ह धनुष्यबाण दिल्याने उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटात नाराजी पसरली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाच्या एका नेत्याने पोलिसात धाव घेत धनुष्यबाण चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातातून शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह हातातून निसटल्यानंतर शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे, तर ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. याचदरम्यान, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा शहर पोलिसांत रीतसर लेखी तक्रार दिली आहे.

'आमच्या पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण चोरीला गेले आहे. त्याचा तपास पोलिसांनी करून आमचे चिन्ह व शिवसेना पक्ष नाव शोधून द्यावे, अशी मागणी तक्रारीमध्ये केली आहे. आमचे धनुष्यबाण चोरले आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी दिलेल्या नमूद करण्यात आली आहे.

Buldhana News
Maharashtra Politics : शिवसेना, धनुष्यबाणाच्या निर्णयानंतर राजकीय घडमोडींना वेग; भाजप-शिंदे गटाचा फॉर्म्युलाही ठरला

पोलीस काय कारवाई करणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटात नाराजी पसरली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने चुकीचा आणि लोकशाही मार्गाने घेतला नसल्याचे म्हटले आहे. याचदरम्यान, बुलढाण्यातील ठाकरे गटाच्या नेत्यांनी धनुष्यबाण चोरीला गेला म्हणत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ठाकरे गटाच्या या तक्रारीवर पोलीस कारवाई करणार का, हे पाहावे लागणार आहे.

Buldhana News
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटला; ठाकरे गटाच्या 'या' याचिकेवर उद्या सुनावणी होणार

ठाकरे गटाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेतील मुद्दे काय?

ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाने निपक्षपाती कर्तव्य बजावण्यात अपयशी झाले आहेत. निवडणूक आयोग संविधानाचे रक्षण कमी पडेल. या निकालावर स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी आहे. सुप्रीम कोर्ट जोपर्यंत निकाल देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोग निकालवर अंमलबजावणी करू नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com