Rajan Salvi News: राजन साळवी यांच्या कुटूंबालाही एसीबीची नोटीस! 20 मार्चला होणार चौकशी, म्हणाले; 'तिकडे गेलं की...'

Maharashtra Politics: राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी तसेच वहिनीला एसीबीने नोटीस पाठवली आहे.
MLA Rajan Salvi
MLA Rajan Salvi saam tv

Rajan Salavi Family Gets ACB Notice: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे नेते राजन साळवी (Rajan Salvi) यांची चौकशी सुरू आहे. आता त्यांच्या कुटूंबियांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजन साळवी यांचा मोठा भाऊ, पत्नी तसेच वहिनीला एसीबीने नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांना २० मार्चला चौकशीसाठीही बोलावण्यात आले आहे. (Latest Marathi New Update)

MLA Rajan Salvi
Amroha News : लग्नाच्या दिवशीच नवरीने घेतला जगाचा निरोप; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा, मन सुन्न करणारी घटना

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घराचीही पाहणी एसीबीकडून करण्यात आली होती. तसेच त्यांना चौकशीसाठीही बोलावण्यात आलं होतं. आता त्यांच्या कुटूंबियांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

याबद्दल बोलताना राजन साळवी यांनी हा दुर्देवी प्रकार असल्याचे म्हणले आहे. "आजच सकाळी माझी पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनी यांना एसीबीची नोटीस आली आहे. 20 मार्चला त्यांना अलिबागच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. ही दुर्दैवी बाब आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे..

MLA Rajan Salvi
Kapil Sharma: तुझे कलाकार शो सोडून का जातात? या प्रश्नावर कपिल शर्माने दिलेलं उत्तर चर्चेत

त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी, "उद्धव ठाकरेंसोबत (Udhav Thackeray) जे आमदार आहेत. त्यांनाच नोटीसा पाठवल्या जात आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांची नावं संग्रही आहेत. पण त्यांना कोणत्याही नोटीसा दिल्या जात नाहीत. तिकडे जाणारे वॉशिंगमशिनसारखं स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त दोषी. याचा आम्ही निषेध करतोय," असेही ते म्हणाले आहेत..

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com