Udhav Thackeray On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी घेतला समाचार, म्हणाले; 'जीभ हासडू...'

Thackeray Group Rally: रत्नागिरी खेडच्या गोळीबार मैदानावरील सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपा तसेच एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam TV

Udhav Thackeray Speech: उद्धव ठाकरेंची आज कोकणात जाहीर सभा पार पडली. शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर त्यांची ही पहिलीच सभा होती. रत्नागिरी खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची ही सभा पार पडली. या सभेतून ठाकरेंनी भाजपा तसेच एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule: 'शिमग्याच्या बोंबा पुरे...' उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेनंतर बावनकुळेंचा हल्लाबोल; 'तुम्ही CM असताना...'

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्व संधेला आयोजित चहा पानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं’ अशी टीका होती. शिंदेंच्या याच वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी खेडमधील सभेत समाचार घेतला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे....

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधताना “काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray
Udhav Thackeray Speech: 'भाजपला गल्लीत कुत्रही विचारत नव्हतं...' खेडच्या सभेत उद्धव ठाकरे कडाडले; CM शिंदेंवर साधला निशाणा

यावेळी पुढे बोलताना "मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला, यांना देशभर फिरुन, गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही, यांचा अर्धा वेळ तर दिल्लीत मुजरा करायला जातोय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. त्याचबरोबर “शिवसेना फोडणारे मराठी माणसाच्या आणि हिंदुंच्या एकजुटतेवर घाव घालत आहेत, असे म्हणत भाजपाला गल्लीतलं कुत्रं विचारत नव्हतं.” अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.. (Maharashtra Politics)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com