Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे CM शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आखला मोठा प्लॅन

Maharashtra Political Crisis: आज ठाकरे गटाच्या नेत्यांनी १६ आमदार अपात्रतेच्या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करा, असे निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे.
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis Saam TV

निवृत्ती बाबर

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. ठाकरे गट १६ आमदारांच्या अपात्रतेवरून आक्रमक झाला आहे. आज ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करा, असे निवेदन विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. ठाकरे गटाने नार्वेकरांना निवेदन देत एकप्रकारे अल्टिमेटम दिला आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. ठाकरे गट शिंदे गटाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे. आज ठाकरे गटाच्या नेत्यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवेदन दिलं आहे.

Maharashtra Political Crisis
Police Bharti 2023: पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्या; नाना पटोलेंच CM शिंदेंना पत्र

ठाकरे गटाच्या आमदारांनी निवेदन देण्यासाठी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, अजय चौधरी आणि रवींद्र वायकर उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political CrisisSaam tv

ठाकरे गट घेणार आक्रमक पवित्रा

ठाकरे गट आता कोर्टाच्या निकालाच्या तारखेपासून तीन महिने कालावधी होईपर्यंत वाट पाहणार आहे. तीन महिन्यांपर्यंत निर्णय न झाल्यास ठाकरे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये मणिपूर प्रकरणाचा संदर्भ घेऊन ही चर्चा झाल्याची माहिती आहे.

Maharashtra Political Crisis
Sharad Pawar News: संसदेत राष्ट्रवादी 'आप'च्या पाठीशी... केजरीवाल यांच्या भेटीनंतर पवारांचे आश्वासन; म्हणाले...

ठाकरे गट तीन महिन्यांपर्यंत निर्णय न झाल्यास मधल्या काळात विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रतीचा संदर्भ घेऊन कोर्टात जाणार आहे. अपात्रतेची कारवाई करण्यासाठी मणिपूर प्रकरणात 3 महिन्यांचा रिजनेबल कालावधी ग्राह्य धरण्यात आल्याने ठाकरे गट त्याच भूमिकेत असल्याची माहिती आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com