Maharashtra Politics: ठाकरे गटाचे आमदार आज विधानसभा सचिवांना भेटणार, अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी देणार पत्र

Thackeray Group (UBT) : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार आज विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांची घेणार भेट आहेत.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Newssaam tv

Uddhav Thackeray News: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगाने घडामोडी घडत आहेत. सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार आज विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांची घेणार भेट आहेत.

सकाळी 11 वाजता विधानभवनात जाऊन ठाकरे गटाचे आमदार सचिवांना भेटतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर ही भेट होणार असल्याने त्याला महत्व प्राप्त झालं आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेबाबत ठाकरे गटाकडून सचिवांना पत्र दिल जाणार आहे.

सुप्रीम कोर्टाने या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या चौकटीत राहून निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मागणी ठाकरे गट आज विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र देऊन त्यांच्याकडे करणार आहे.

Uddhav Thackeray News
Jayant Patil ED Notice Update: जयंत पाटलांना पुन्हा ईडीचा समन्स; 'या' तारखेला होणार चौकशी

जमले तर अध्यक्षांनाही भेटू - सचिन आहिर

आज विधानसभा अध्यक्ष येणार आहेत. त्यामुळे सर्व आमदारांनी बोलावले आहे. सर्वांना सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा अर्थ कळावा यासाठी आमची बैठक होणार आहे. ज्याला जो अर्थ घ्यायचा आहे तो घेऊद्या, आमचे वकील आम्हाला त्याची माहिती देतील. ज्या गोष्टी आम्हाला कळल्या, त्याबाबतचे पत्र आम्ही सचिवांना देणार आहोत. अध्यक्ष पण आज येणार आहेत असे कळतंय, त्यामुळे जमले तर त्यांनाही भेटू असे ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर मोठा निर्णय देताना 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे आणि त्यांना पर्याप्त वेळेत यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सध्यातरी सरकार कायम राहिले असून शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Breaking News)

मात्र कोर्टाने शिंदेंनाही मोठा झटका दिला आहे. कोणताही गट अपात्रतेच्या कारवाईच्या बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा युक्तिवाद करू शकत नाही असं कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचा व्हीप म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच सुनील प्रभू हेच मुख्य प्रतोद असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केले आहे. (Latest Political News)

Uddhav Thackeray News
BMC Election News : उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूतीच्या लाटेमुळे बीएमसीची निवडणूक पुढच्या वर्षीपर्यंत ढकलली जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढला असं कोणत्याही पत्रात म्हटलं नव्हतं. दहाव्या सुचीप्रमाणेव्हीप हा गटनेत्याचा नाही तर राजकीय पक्षाचा पाळला जातो. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या 16 आमदारांच्या पात्रतेबाबत कधी आणि काय निर्णय घेतात याकडे ठाकरे गटासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com