
Sanjay Raut Tweet: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. या कारवायांमुळे महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये संजय राऊत यांनी दौंडमधील भीमा साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. भाजपा आमदार राहुल कूल यांच्या मालकीचा हा साखर कारखाना आहे.
विशेष म्हणजे विधिमंडळाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संजय राऊत यांच्यावर हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली गेली होती. यासाठी नेमल्या गेलेल्या राऊत हक्कभंग चौकशी समितीचे आमदार राहुल कुल हे प्रमुख आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात कसे , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे संजय राऊत यांचे ट्विट...
"मा. देवेंद्र जी भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसत आहे. 500 कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे" असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच या ट्विटसोबत त्यांनी या गैरव्यवहाराबद्दलची माहितीही जोडली आहे.
या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना "आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांचे साखर कारखाने भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत. या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला आतो. भ्रष्टाचाराचा धर्म व राजकीय पक्ष नसतो. या मताचा मी आहे," असे म्हणत या प्रकरणात शेतकऱ्यांची लूट झाली असून निःपक्ष चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.