Firing on youth in Thane: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणावर झाडली गोळी, अंबरनाथमधील थरारक घटना

Thane Latest News Updates : दुचाकीवरून आलेल्या दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातले होते असे जखमी अवस्थेतील तरुणाने सांगितले.
Pune crime News
Pune crime NewsSaam tv

>>अजय दुधाणे, साम टीव्ही

Thane Crime News: अंबरनाथमध्ये बदलापूर रोडवर दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलोक यादव असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असून तो गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. या प्रकणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास कल्याण बदलापूर रोडवर अंबरनाथ येथून अलोक यादव आपल्या दुचाकीवरून उल्हासनगरच्या दिशेने जात होता. तो ऑडनस फॅक्टरी जवळ आला तेव्हा समोरून दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्याच्यावर रिव्हॉल्व्हमधून गोळी झाडली. दुचाकीवरून आलेल्या दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातले होते असे जखमी आलोकने सांगितले. (Tajya Marathi Batmya)

Pune crime News
Maharashtra Rain Alert: पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, पुण्यात आज जोरदार सरी बरसणार

आलोक यादव याला कल्याणजवळील म्हारळ गावात राहणारा असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. आलोकला जखमी अवस्थेत उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्या मांडीत गोळी अडकल्याने त्याला मुंबई येथे उपचारात पाठविण्यात आले आहे. (Latest Political News)

Pune crime News
Petrol Diesel Price 16 July: पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर काय; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र या घटनेत पोलीस काहीही बोलण्यास तयार नसून गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देऊ असे पोलिसांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com