
Thane News: ठाण्यातील (Thane) ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर त्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. या घटनेनंतर ठाकरे गटाने ठाण्यात मोठा मोर्चा काढला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर रोशनी शिंदे यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असतानाच या प्रकरणाची महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली आहे.
महिला आयोगाने या प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आयुक्त ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत. त्यानंतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अहवाल सादर केला. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी हे आदेश दिले आहेत. फेसबुक या समाज माध्यमावर पोस्ट केल्याचा राग धरून रोशनी शिंदे यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याची घटना वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे.
राजकीय वातावरण तापले..
घटनेनंतर ठाकरे गटाकडून पोलीस आयुक्तालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकार आणि पोलिसांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल ठाण्यात जनआक्रोश मोर्चा पार पडला. यावेळी माजी मंत्री अनिल परब, विनायक घोसाळकर, जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.