
बीड : बीड जिल्ह्यात (Beed) गेल्या काही महिन्यात चाईल्ड पॉर्नचा व्हिडिओ, सोशल मीडियावर (Social Media) प्रसारित केल्याचं उघडकीस आलं होतं. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, बीड सायबर पोलिसांनी (Cyber Police) अखेर या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गोविंद क्षीरसागर वय ३२ रा. संत नामदेव नगर, धानोरा रोड बीड असं त्या आरोपीचे नाव आहे. बीड येथून चाईल्ड पॉर्न व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर (Social Media) प्रसारित केल्याची माहिती राज्य सायबर कडून बीड सायबर पोलीसांना मिळाली होती.
या घटनेने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणात पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून, बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) अज्ञात आरोपीवर कलम २९४ भादंवि सह कलम १३ (४), १४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधि सह ६७ (ब) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा बीड सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत, इंटरनेट कॅफे चालक असणाऱ्या, आरोपी गोविंद क्षीरसागर याला अटक केली. दरम्यान आरोपी गोविंदला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.