गडचिरोली-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील गोविंदपूर येथील पर्यायी रस्ता गेला वाहून

हा पर्यायी मार्ग वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस प्रशासनाने याची तातडीने दखल घेत कुनघाडा-पोटेगाव मार्गे वाहतूक वळविली आहे.
गडचिरोली-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील गोविंदपूर येथील पर्यायी रस्ता गेला वाहून
गडचिरोली-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील गोविंदपूर येथील पर्यायी रस्ता गेला वाहूनसंजय तुमराम

संजय तुमराम

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असून यामुळे चामोर्शी तालुक्यातील गोविंदपूर येथे गडचिरोली-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. The alternative road at Govindpur near Gadchiroli-Hyderabad National Highway swept away

हे देखील पहा -

गडचिरोली-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेने वाहतूक ठप्प झाली आहे. या संपूर्ण मार्गाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. सुमारे 100 किमी मार्गावरील विविध ठिकाणी नाल्यांवर पर्यायी मार्ग काढून वाहतूक वळविण्यात आली आहे.

गडचिरोली-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील गोविंदपूर येथील पर्यायी रस्ता गेला वाहून
दहिवडी कॉलेज मध्ये परीक्षा फी व फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सी वर चामोर्शी तालुक्यातील गोविंदपूर गावाजवळ असेच एक पुलाचे बांधकाम मोठ्या नाल्यावर सुरू आहे. यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हा पर्यायी मार्ग वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस प्रशासनाने याची तातडीने दखल घेत कुनघाडा-पोटेगाव मार्गे वाहतूक वळविली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याशिवाय हा मार्ग सुरळीत होण्यात अडचणी निर्माण होणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com