'पापा मुझे मारा' मेसेज केल्यानंतर आदिवासी मुलाची हत्या; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासा

आदर्शचा मृत्यू नसून हत्या झाल्याचा संशय घरच्यांना आला होता कारण, आदर्शने आपल्या वाडिलांना मृत्यूच्या एक दिवस आधीच फोन करत 'मुझे यहा नही रहना, मुझे यहा बहुत मारते है!' असं सांगण्याचा प्रयत्न केला होताा.
Amravati Crime
Amravati Crimeअमर घटारे

अमर घटारे -

अमरावती : अमरावती (Amravati) येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व तेथेच वसतिगृहात राहणाऱ्या आदर्श नितेश कोगे वय वर्ष १३ रा. जामली या आदिवासी विद्यार्थ्याचा दिनांक २१ जुलै रोजी वसतिगृहात मृतदेह आढळला होता. मात्र, आदर्शचा मृत्यू नव्हे तर नाक तोंड दाबून कोणीतरी त्याची हत्या केली असल्याचा धक्कादायक खुलासा शवविच्छेदन अहवालातून झाला आहे.

आदर्शचा मृत्यू नसून हत्या झाल्याचा संशय घरच्यांना होता कारण, मृतक आदर्श याने आपल्या वाडिलांना मृत्यूच्या एक दिवस आधीच फोन केला होता. यावेळी त्यांने, 'मुझे यहा नही रहना, मुझे यहा बहुत मारते है!' असं सांगण्याचा प्रयत्न तो करत असतानाच फोन कट झाला होता. शिवाय "मुझे बहुत मारा" असं लिहलेला एक मेसज (Message) त्यांने वडिलांना पाठवला होता.

Amravati Crime
नांदेड हादरलं! महिलेचा नको त्या अवस्थेत व्हिडिओ बनवला; त्यानंतर घडलं भयंकर

त्याच्या या फोन आणि मेसेजमुळे त्याला कोणी तरी मारल्याचा संशय घरच्यांना आल्याने त्यांनी वसतिगृह (Hostel) प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मृत विद्यार्थ्याचे वडील नितेश कोगे यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांकडे एका तक्रारीतून केली होती.

दरम्यान, आदर्शचे शवविच्छेदन अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा करण्यात आले यात त्याचा नाक आणि तोंड दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल प्राप्त झाला आहे. वसतिगृहाचे वार्डन रवींद्र पांडुरंग तिखाडे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे (Gadgenagar Police Station) पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

या धक्कादायक घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थी चांगलेच धास्तावले असून त्यांच्यामध्ये भितीचं वातावरण पसरंल आहे. पोलिस आयुक्त डॉ.आरती सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यालय व वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली असून नेमक तोंड कोणी दाबलं कोणी मारलं याचा शोध पोलीस आता घेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com