काशीद पूल दुर्घटनेत भायदेच्या हुशारीने वाचविले स्वतःचे कुटूंब

मयत विजय चव्हाणला विचविण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला आहे.
काशीद पूल दुर्घटनेत भायदेच्या हुशारीने वाचविले स्वतःचे कुटूंब
काशीद पूल दुर्घटनेत, भायदेच्या हुशारीने वाचविले स्वतःचे कुटूंबराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : दैव बलवत्तर असले की मरणाच्या दारातून परत येता येत. असा अनुभव पनवेल येथे राहणाऱ्या सागर भायदे कुटूंबानी काल 11 जुलै रोजी अनुभवला आहे. मुरुड अलिबाग रस्त्यावरील काशीद पूल दुर्घटनेतून भायदे कुटूंब हे आपल्या हुशारीमुळे आपला स्वतःचा जीव वाचविण्यात यशस्वी ठरले आहे. The Bhaide family has succeeded in saving their own lives due to their ingenuity

या दुर्घटनेत मयत झालेले विजय चव्हाण याला वाचविण्याचा प्रयत्न मात्र भायदे याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. भायदे कुटूंबाची वेळ आली होती पण काळ आला नव्हता. त्या क्षणांची आठवण झाली तरी भायदे यांच्या अंगावर काटा उभा राहतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत विजय चव्हाण या मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. त्याला बचविण्याचा प्रयत्न सागर भायदे यांनी केला होता मात्र तो अयशस्वी ठरला.

हे देखील पहा-

पनवेल येथे राहणारे सागर भायदे (40) हे आपली पत्नी शोभा भायदे (38), श्री भायदे (9), नील भायदे (4), या आपल्या दोन मुलासह आणि उजिता पिपले (38), पुष्पा सकपाळ (38) यांच्यासह 11 जुलै रोजी मुरुड येथे आपल्या नातेवाईकांकडे कारने आले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा कारने पनवेलकडे जाण्यास निघाले होते. यावेळी मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. रस्त्यावर पाणीच पाणी त्यात काळोख आणि वरून मुसळधार पाऊस अशा कठीण परिस्थितीत निघाले होते. मात्र पुढे आपले मरण वाढून ठेवले आहे याची सुतराम कल्पना भायदे कुटूंबाला नव्हती. पडत असलेल्या मुसळधार पावसाने मुरुड अलिबाग रस्त्यावरील काशीद येथील पूल वाहून गेला होता. याबाबत भायदे याना काहीच कल्पना नव्हती आणि पुढे घडणारे ते घडलेच.

कुटुंबाने लढविली शक्कल:

काशीद पूल वाहून गेल्याने भायदे यांची कार पुलावरून खाली वाहत्या पाण्यात पडली. आपले मरण समोर पाहून भायदे कुटूंब भयभीत झाले. डोंगरातून समुद्राकडे जाणाऱ्या पाण्याला जोरही होता. यात भायदे कुटूंबाची कार बाजूच्या झाडाला अडकली आणि वाचण्याची आशा पल्लवित झाली. कार खाली पडताना मागची काचेला तडे गेले होते. याचा फायदा घेऊन भायदे याच्या मुलाने हाताने काच फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वयाच्या मनाने ते कठीण जात होते. अशा कठीण परिस्थितीतही श्रीने हुशारी दाखवून डोक्याला टेकणारी सीटवरील सीट काढून काच फोडण्यास सुरुवात केली आणि त्याला यश आले.

काशीद पूल दुर्घटनेत, भायदेच्या हुशारीने वाचविले स्वतःचे कुटूंब
वीज पडली अन जमिनीतून सुरु झाला पाण्याचा उफळा...!

नगराध्यक्ष संदीप पाटील यांची मदत:

काच फोड्ल्यानंतर सागर भायदे यांनी मुलांना आणि इतरांना बाहेर काढून बाजूच्या झाडाचा आधार घेतला. वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागले. मात्र कोणालाही आवाज येत नव्हता. भायदे याच्या पत्नीकडे असलेल्या फोनवरून मुरुडचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांना फोन करून माहिती दिली. संदीप पाटील यांनी त्वरित बारशिव येथील निलेश घाटवळ याना फोनकरून माहिती दिली. त्यानंतर त्वरित घाटवळ यांनी आपल्या सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

त्याचवेळी सागर भायदे यांनी आपल्या मुलांना खांद्यावर चढवून रस्त्यावर ढकलले. त्यानंतर मुलांनी उपस्थित ग्रामस्थांना जाऊन माझे आई वडील पाण्यात अडकले असल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेऊन सर्वांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत भायदे याचा चार वर्षाचा मुलगा, पत्नी आणि पत्नीची मैत्रीण उजिता पिपले जखमी झाल्या. या सर्वांना घाटवळ यांनी रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com