भंडारदरा निम्मे भरले तर कोथळे ओव्हर फ्लो

भंडारदरा निम्मे भरले तर कोथळे ओव्हर फ्लो
अकोले तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने भंडारदरा धरणात मोठी आवक सुरू आहे.

अहमदनगर : मराठवाडा आणि नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. रतनवाडी आणि घाटघर परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. पर्यटकांसाठी हा पाऊस चांगला असला तरी जीवावर बेतणारा आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटघर आणि रतनवाडीत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत रतनवाडी येथे साडेसहा आणि घाटघर येथे पाच इंच पाऊस झाला आहे. त्यामुळे आज सकाळी सहापर्यंतच्या चोवीस तासांत धरणात ४२९ दशलक्ष घनफूट पाणी नव्याने जमा झाले. त्यामुळे भंडारदरा जलाशय ५० टक्के तर कोथळा १०० टक्के भरले आहे. परिसरात आवणीच काम जोरात सुरू झाली आहेत.

अकोले तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्याने भंडारदरा धरणात मोठी आवक सुरू आहे.
राज कुंद्रा आणि कंपनीचे हे होते उद्योग; पोलिसांनी दिली माहिती

भंडारदरा परिसरात सर्वत्र डोंगरांवरून धबधबे कोसळताना दिसू लागले आहेत. काही ठिकाणी भात आवणीच्या कामाला वेग आला आहे. कृष्णावती नदीला पूर आला आहे. वाकी प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहे. रंधा धबधबा कोसळू लागला आहे. कोदणी वीज प्रकल्पही सुरू झाला आहे. सायंकाळी भंडारदरा धरणात ३०२८ दशलक्ष घनफूट साठा झाला होता. दरम्यान, निळवंडे धरणातून विसर्ग सायंकाळी बंद करण्यात आला आहे.

मुळा पाणलोटात हरिश्चंद्रगड, आंबित, पाचनई, कुमशेत परिसरात संततधार सुरू आहे. अंबित पिंपळगाव खांड पाठोपाठ कोथले धरण ओव्हर फ्लो' झाले आहे. मुळा नदीतून सकाळी पाच हजार४४९ क्यूसेक वेगाने पाणी वाहतेय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय.

लघु पाटबंधारे तलाव (कोथळे, ता. अकोले जि. अहमदनगर) रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पाची साठवण क्षमता १८२ दलघफू आहे. सदर प्रकल्प स्थानिक कोथळे नाल्यावर बांधला आहे. हा विसर्ग पुढे मुळा नदीमध्ये प्रवाहीत होत आहे. फोफसंडी (ता. अकोले) संततधारेमुळे शिवारातील शेतीत पाणीच पाणी झाले आहे.

मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला पाऊस (मिलिमीटर) : भंडारदरा ११७, धरणांतीला साठा ५५९०(दशलक्ष घनफूट)जलाशय ५०टक्के भरले: घाटघर १२५, रतनवाडी १५५, पांजरे १२२, वाकी , निळवंडे ९५ आढळा ११, अकोले ३, कोतूळ १४ भंडारदरा ५५८९, निळवंडे १६०० दशलक्ष घनफूट पाण्याची अवाक १०० दशलक्ष घनफूट इतकी आहे.रतनवाडीत साडेसहासहा इंच, घाटघरला ५ इंच पाऊस पडला. देव हंडी शिरपूजे, वाकी जलाशय भरले जाईल, असे जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी सांगितले.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com