हिंगोली शहरात 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Hingoli Crime News in Marathi, Hingoli Latest Marathi News
Hingoli Crime News in Marathi, Hingoli Latest Marathi NewsSaam Tv

हिंगोली - शहरातील साईनगर भागात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी बारा वाजता या परिसरातील लोकांना दुर्गंधी येत होती. ही दुर्गंधी जनावर मृतावस्थेत पडले असल्याने येत असावी असा अंदाज या परिसरातील नागरिकांनी बांधून याची माहिती हिंगोली नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिली. मात्र स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाहणीत या ठिकाणी एका इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Hingoli Crime News in Marathi)

हे देखील पाहा -

दरम्यान हिंगोली शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित इसमाचा मृतदेह ताब्यात घेत हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये दाखल केला आहे. मात्र हा इसम नेमका कुठला आहे व त्याच नाव काय या बाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिलेली नाही. या घटनेप्रकरणी हिंगोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com