छळाला कंटाळून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून; पाहा Video

दत्तात्रय पाटील असं मृताच नाव आहे तर अमोल पाटील असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे.
छळाला कंटाळून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून; पाहा Video
छळाला कंटाळून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून; पाहा Videoसंभाजी थोरात

कोल्हापूर: कोल्हापूरच्या (Kolhapur Murder Case) केनवडेमध्ये पोटच्या मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दारू पिऊन घरात मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याने वडिलांची हत्या केल्याच वृत्त आहे. डोक्यात पहार घालून हत्या केली आहे. त्यानंतर अपघाताचा बनाव केल्याचं देखील समजत आहे. कागल पोलिसांनी छडा लावून मुलाला अटक केली आहे. दत्तात्रय पाटील असं मृताच नाव आहे तर अमोल पाटील असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे.

छळाला कंटाळून पोटच्या मुलाने केला वडिलांचा खून; पाहा Video
खडसेंना झटका! ED ने दाखल केलं हजार पानी आरोपपत्र; पाहा Video

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, ३० ऑगस्टला कागल-निढोरी मार्गावर केनवडे ओढ्याच्या पुलावर वाहनाच्या धडकेत दत्तात्रय पाटील यांचा अपघात झाल्याची फिर्याद कागल पोलिसांत दाखल झाली होती. पंचनामा करताना पोलिसांना दत्तात्रय पाटील यांच्या अंगावर इतरत्र कोठेही जखम न झाल्याचं समोर आलं. फक्त डोक्यालाच जबर मार लागला होता यावरुण पोलिसांना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक वाकचौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास यंत्रणा कामाला लावली. तपासात पोलिसांना धागेदोरे हाती लागले. दत्तात्रय पाटील कामानिमित्त इचलकरंजीत राहत असे. पत्नी व मुलगा अमोल यांच्यासोबत दारु पिवून वाद घालत असे. याच रागातून अमोलने वडिलांचा खून केल्याचं तपासाअंती उघड झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com