६० फूट विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान

या बैलाला बेल्ट लावून क्रेनच्या साहाय्याने उचलून त्याला सुखरूप बाहेर काढुन जीवदान देण्यात आले आहे.
६० फूट विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान
६० फूट विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदानविश्वभूषण लिमये

सोलापूर - जिल्ह्यातील गुळवंची Gulvanchi गावातील एका साठ फूट खोल विहिरीमध्ये Well बैल Bull पडला होता. या बैलाला बेल्ट लावून क्रेनच्या साहाय्याने उचलून त्याला सुखरूप बाहेर काढुन जीवदान देण्यात आले आहे. गुळवंची तांडा येथील एका सार्वजनिक विहिरीमध्ये गोशाळेमधील बैल पडल्याची माहिती डब्लूसीए आणि अँनिमल राहत संस्थेच्या सदस्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बैल विहिरीबाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात केली. The bull had fallen into a sixty feet deep well in Gulwanchi village

हे देखील पहा -

दरम्यान,मोठ्या ऊंची वरून बैल विहिरीत पडल्यामुळे त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे बचावकार्यासाठी कार्यकर्ते विहिरीमध्ये उतरल्या नंतर बैल चवताळला होता. मात्र,बैलाला गोंजारून त्याच्या पाठीवरून हाथ फिरवल्यामुळे तो शांत झाला. त्यानंतर त्याला बेल्ट लावून क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यासाठीच्या मोहिमेला जवळपास अडीच ते तीन तासांचा कालावधी लागला. बैलाला बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले.वैद्यकीय उपचार देऊन बैलाची गोशाळेमध्ये परत रवानगी करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com