Latur: किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार एकाच डॉक्टरवर; रुग्णांची हेळसांड

आरोग्य केंद्रा अंतर्गत ५ उपकेंद्रे असून त्यामध्ये ३० गावांचा समावेश आहे. साधारणत: ३३ हजार लोकसंख्येचा भार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. किनगाव आरोग्य केंद्रांतर्गत किनगाव, कोपरा, विळेगाव, चिखली, हिंगणगाव अशी पाच उपकेंद्रे आहेत.
Latur: किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार एकाच डॉक्टरवर; रुग्णांची हेळसांड
Latur Primary Health Centerदीपक क्षीरसागर

लातुर - जिल्ह्यातील अहमदपूर (Ahmedpur) तालुक्यातील किनगाव (Kingaon)येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असली तरी अडीच महिन्यांपासून एक डॉक्टर दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत. त्यामुळे एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा भार पडला आहे. परिणामी, रुग्ण व नातेवाइकांची अडचण होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. (Latur Latest News)

अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. परभणी (Parbhani) बीड (Beed) आणि लातूर (Latur) या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर हे गाव असल्याने जिल्ह्यातील या भागातील रुग्णांसह अन्य दोन जिल्ह्यांच्या सीमाभागातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. येथील आरोग्य केंद्रा अंतर्गत ५ उपकेंद्रे असून त्यामध्ये ३० गावांचा समावेश आहे. साधारणत: ३३ हजार लोकसंख्येचा भार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. किनगाव आरोग्य केंद्रांतर्गत किनगाव, कोपरा, विळेगाव, चिखली, हिंगणगाव अशी पाच उपकेंद्रे आहेत.

हे देखील पहा -

अहमदपूर तालुक्यातील आरोग्य पदे हे प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय महामार्गावर व राज्य महामार्गावर असल्याने या ठिकाणी रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात येत असते. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज साधारणतः २०० ते २५० बाह्यरुग्ण तर दर बुधवारी बाजारादिवशी तर ३०० ते ३५० बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अपघात, बाळंतपण, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, सर्पदेश, श्वानदंश असे बहुतांश रुग्ण असतात. तसेच मतदेहाचे शवविच्छेदनही केले जाते विशेषतः अपघाती रुग्णांची संख्या अधिक असते.

सध्या एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने नियमित लसीकरण, कोविड लसीकरण, कोविड तपासणी, प्रयोगशाळा तपासणी, गरोदर माता तपासणी, असंसर्गिक आजार अशा रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक दिवसाआड उपकेंद्राला भेट द्यावी लागते. त्यातच लॅबटेक्निशियन, एमपी डब्ल्यू आणि सफाई कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे ही सर्व पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Latur Primary Health Center
Maharashtra Corona Update: राज्यात 43 हजार 211 नव्या रुग्णांची नोंद

किनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांची दोन्ही पदे भरण्यात आली आहेत सध्या एक वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले आहेत कोविडच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील जे वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले आहेत त्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आहेत. त्यामुळे ते लवकरच रुजू होतील जे डॉक्टर रुजू होणार नाहीत. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला जाईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com