नागपुरातील सराफांना भारतीय मानक ब्युरोनं बजावली नोटीस

नागपुरातील सराफा व्यापाऱ्यांना भारतीय मानक ब्युरोनं नोटीस बजावली असून जुने हॉलमार्किंगच्या दागिन्यांची माहितीही मागितली आहे.
नागपुरातील सराफांना भारतीय मानक ब्युरोनं बजावली नोटीस
नागपुरातील सराफांना भारतीय मानक ब्युरोनं बजावली नोटीसSaam Tv

भारतीय मानक ब्युरोनं नागपुरातील ८५० सराफा व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून जुन्या हॉलमार्किंग दागिन्यांची माहिती मागविली आहे. The Bureau of Indian Standards has issued notices to bullion traders in Nagpur

१५ दिवसांमध्ये माहिती न दिल्यास आणि जुन्या हॉलमार्क चे दागिने मिळाल्यास सराफ व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचही या नोटीस मध्ये बजावण्यात आलं आहे. नागपुरातील सराफ व्यापाऱ्यांनी मात्र याचा निषेध व्यक्त केला असून भारतीय मानक ब्युरोनं बजावली नोटीस जुने हॉलमार्किंगच्या दागिन्यांची मागितली माहिती आहे ती देण्यासही व्यापाऱ्यांनी नकार दिला आहे.

केंद्र सरकारनं Central goverment रेकॉर्ड नसलेले हॉलमार्किंगHallmarking जारी केले आहेत. त्यामुळे जुने आणि बनावट हॉलमार्कचे दागिने असल्यास ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणूनच जुन्या दागिन्यांचा रेकॉर्ड पुन्हा तयार करण्यात येणार आहेत. मात्र रेकॉर्ड बरोबर असेल तर सराफ व्यापारी जुन्या हॉलमार्कचे दागिने विकू शकतात.

पूर्वी हॉलमार्किंगच्याHallmarking दागिन्यांमध्ये चार मार्क लावण्यात यायचे. त्यात कॅरेट Carat शुद्धता, बीआयएसचा BIS लोगो, हॉलमार्किंग सेंटरचा आणि ज्वेलरचा कोड होता. मात्र, या प्रक्रियेत बदल केला असून यामध्ये आता फक्त तीनच मार्क लावण्यात येत आहेत. यात बीआयएसचा लोगो, कॅरेट शुद्धता आणि यूआयडी आधारित चिन्हाचा Logo वापर करण्यात येतोय.

तसेच सराफा व्यापाऱ्यांना To merchants मिळालेल्या नोटीसमुळे सरकारविरुद्ध नाराजीचा सुर उमटला असून आम्ही स्टॉकची माहिती देणार नाही, अशी भूमिका सराफ व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

नागपुरातील सराफांना भारतीय मानक ब्युरोनं बजावली नोटीस
मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही - गोपीचंद पडळकर

दरम्यान स्टॉकची माहिती मागण्याचा बीआयएसला अधिकारच नाही, यावरूनच सरकारला आपल्याच केंद्रावर विश्वास नाही, असा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय. मात्र, याच कारणामुळेच व्यापारी हॉलमार्कमध्ये नोंदणी करण्यास इच्छुक नव्हते. तसेच शहरातील 3500 व्यापाऱ्यांपैकी 845 व्यापाऱ्यांचीच नोंदणी झाली असून नोंचनी करण्यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस मिळत आहे. त्यामुळं आगामी काळात सराफा व्यापारी आणि सरकारमध्ये संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By- Jagdish Patil

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com