वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार; नाशिक महापालिकेचा निर्णय!

महापालिकेचा हा निर्णय कौतुकास्पद असला, तरी या निर्णयानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतायत.
वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार; नाशिक महापालिकेचा निर्णय!
वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार; नाशिक महापालिकेचा निर्णय!SaamTvnews

नाशिक : नाशिक शहरातील वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय नाशिक महापालिका प्रशासनानं घेतलाय. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील जातीवाचक वस्त्यांची नावं बदलली जाणार आहेत. महापालिकेचा हा निर्णय कौतुकास्पद असला, तरी या निर्णयानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटतांना पाहायला मिळतायत.

नाशिकमधील जातीवाचक वस्त्यांच्या नावांच्या जागी आता लवकरच किल्ले, नद्या, झाडं आणि फुलांची नावं पाहायला मिळणार आहेत. कारण नाशिक महापालिकेनं शहरातील जातीवाचक वस्त्यांची नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय.

हे देखील पहा :

राज्यातील गावांची, रस्त्यांची, वस्त्यांची जातीवाचक नावं बदलून नवीन नावं देण्याचा निर्णय मागील वर्षी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करणारं नाशिक पहिलं शहर ठरणार आहे. सुरवातीला पहिल्या टप्प्यात शहरातील 80 जातीवाचक वस्त्यांची नावं बदलण्यात येणार असून त्याऐवजी राज्यातील किंवा नाशिक जिल्ह्यातील किल्ले, नद्या, झाडं अथवा फुलांची नावं या वस्त्यांना देण्यात येणार आहेत.

महापालिकेनं जातीवाचक नावं बदलण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर नाशिकमध्ये सर्वच स्तरातून संमिश्र अशा प्रतिक्रिया येतायत. नाशिक महापालिकेचा हा निर्णय जातीभेद समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल ठरेल, असं काही नाशिककरांना वाटतंय. तर फक्त नावं बदलण्याऐवजी नावांसोबतचं सामाजिक मानसिकतादेखील बदलण्याची गरजही नागरिक व्यक्त करत आहेत.

वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार; नाशिक महापालिकेचा निर्णय!
Breaking : अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलावर मालकाचा अनैसर्गिक अत्याचार!
वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार; नाशिक महापालिकेचा निर्णय!
Viral Video : राजस्थानमध्ये महिलेच्या अंगावर JCB चढवून ठार मारण्याचा प्रयत्न!

देशात पूर्वी बाराबलुतेदार पद्धत अस्तित्वात असल्यानं पूर्वी शहरातील वस्त्यांना जातीवाचक नावं दिली जायची. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही अजून हिचं नावं कायम असल्यानं अशा वस्त्यांकडे विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिलं जातं.

त्यामुळे जातीभेद नष्ट व्हावा तसंच सामाजिक समरसतेच्या उद्देशानं राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जातीवाचक वस्त्यांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नव्हती. आता नाशिक महापालिकेनं यासाठी पुढाकार घेतला असून जातीवाचक वस्त्यांची नावं बदलणारं नाशिक राज्यातलं पहिलं शहर ठरणार आहे. नावं बदलण्याच्या मुद्द्यावरून मतमतांतरं असली, तरी हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह म्हणायला हवा.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com