...म्हणून राज्य सरकारच्या विरोधात, 72 शेतकऱ्यांच्या मुलांनी केले मुंडण आंदोलन !

72 तास अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस असून तरी देखील राज्य सरकार State Govermet या आंदोलनाला प्रतिसाद नाही.
...म्हणून राज्य सरकारच्या विरोधात, 72 शेतकऱ्यांच्या मुलांनी केले मुंडण आंदोलन !
...म्हणून राज्य सरकारच्या विरोधात, 72 शेतकऱ्यांच्या मुलांनीच केले मुंडण आंदोलन !दीपक क्षीरसागर

लातुर : आज 72 तास अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस सुरू आहे. तरी देखील राज्य सरकार State Govermet या आंदोलनाला प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये मोठा संताप दिसून येत आहे आता शेतकऱ्यांच्या 72 मुलांनी राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत मुंडण करून सहभाग नोंदवला आहे. (The children of 72 farmers agitated against the state government)

हे देखील पहा -

मागील महिन्यात मराठवाड्यात Marathwada पावसाने हाहाकार Heavy Rain माजवला होता या पावसामुळे सोयाबीन Soyabean या प्रमुख पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हाताशी आलेला घास या मुसळधार पावसामुळे हिरावला गेलाच मात्र विमा कंपन्यानी Insurance company 72 तासात नुकसानीची माहिती देणे बंधनकारक केलं होतं.

...म्हणून राज्य सरकारच्या विरोधात, 72 शेतकऱ्यांच्या मुलांनीच केले मुंडण आंदोलन !
"शरद पवारांच्या नंतर शेतकऱ्यांना कोणी समजत असेल तर ते उद्धव ठाकरेच"

माहीती देवून देखील अद्यापही विमा कंपन्यांनी किंवा राज्य शासनाच्या वतीने काहीच आर्थिक मदत मिळाली नसल्याने निलंगा येथील भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर BJP MLA Sambhaji Patil यांच्या नेतृत्वाखाली 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आज त्याचा दुसरा दिवस असून लातुर जिल्ह्यातील 72 शेतकऱ्यांच्या मुलांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे याप्रसंगी 72 शेतकऱ्यांच्या मुलांनी मुंडण आंदोलन करत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.