सोनपेठ करांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या प्रश्नावर काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सोनपेठ करांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास
सोनपेठ करांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवासराजेश काटकर

परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) ग्रामीण भावात रस्त्यांचा प्रश्न अजून देखील गंभीर बनलेला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या प्रश्नावर काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काल सायंकाळच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील थळीउक्कलगाव, शेळगावं परिसरात काल दमदार पाऊस झाला. परिणामी परिसरातील फालगुणी नदीला अचानक पूर आल्याने परिसरातील नागरिकांना गुडग्या एवढ्या पाण्यातून वाट काढावी लागली.

गावाकडे जाण्यासाठी फालगुणी नदीवरील पूल हा एकमेव मार्ग असल्याने नागरिकांची मोठी दमछाक झाली. अक्षरशः महिला, लहान मुलांचा जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागला. प्रशासनाने तात्काळ फालगुणी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी परिसरात नागरिकांनी केली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com