शोले स्टाईल आंदोलनाचं केंद्रबिंदू झालं भुईसपाट

सोलापूर कलेक्टर कचेरीतील वादग्रस्त टॉवर अखेर हटवण्यात आले आहे.
शोले स्टाईल आंदोलनाचं केंद्रबिंदू झालं भुईसपाट
शोले स्टाईल आंदोलनाचं केंद्रबिंदू झालं भुईसपाटविश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शोले स्टाईलने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या शैकीनाला आता पूर्णविराम मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील वायरलेस मोबाइल टॉवर हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. (The controversial tower at the Solapur Collectorate has finally been removed)

हे देखील पहा -

विविध मागण्या घेऊन अनेक शेतकरी आणि राजकीय कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील वायरलेस मोबाइल टॉवर वरती चढून शोले स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घ्यायचे. अशा आंदोलकांना जिल्हा प्रशासनाने वैतागून टॉवर काढुन टाकण्याचा निर्णय घेतला. मागील दोन महिन्यांपासून टॉवर काढण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरु होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर ही जबाबदारी पीडब्ल्यूडीने ही जबाबदारी स्वीकारली असून पीडब्ल्यूडी स्वखर्चाने टॉवर काढत आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.