धक्कादायक : 45 गायींसह अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू; शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण

जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर गाईंचे मृत्यू (Death of cows) होत असून तेही हतबल झाले आहेत.
धक्कादायक : 45 गायींसह अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू; शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण
धक्कादायक : 45 गायींसह अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू; शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरणगोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील (Rahuri taluka) तिळापुर Tilapur गावामध्ये लाळ्या खुरकूत सदृश्य आजाराने पाळीव जनावरांचे मृत्यूचे तांडव सुरू आहे. आठवड्याभरापूर्वी 45 गायी सह इतर शेळ्या बोकड या पाळीव प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर गाईंचे मृत्यू Death of cows होत असून तेही हतबल झाल्याने पशुपालक पुरते धास्तावले आहेत.

हे देखील पहा -

ऐन दिवाळीत पशुपालक शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तिळापुर गावातील अनेक शेतकऱ्यांच्या गाई दगावल्या आहे. शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे गाईंचे गोठे आहे. मात्र शेतकऱ्यांच्या गाईंच्या मृत्यूचे तांडव सुरू असूनच आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या गाई गंभीर आजारी आहे. त्यांचाही मृत्यू कधीही होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा दिवाळी सण कधी आला आणि कधी गेला तिळापूर गावातील शेतकऱ्यांना समजलं नाही अशी व्यथा ही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

धक्कादायक : 45 गायींसह अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू; शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण
धक्कादायक: लग्न दुसरीकडे ठरवलं म्हणून प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार; स्वत:लाही संपवलं !

पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) तिळापुर गावांमध्ये तळ ठोकून आहे. पशुपालक शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी अनेक गायींचा मृत्यू झाला असून तिची भरपाई मिळावी आणि आजारी गायांचा त्वरित विमा उतरून शेतकऱ्यांना मदत करावी हीच मागणी तिळापूर गावातील शेतकरी शासन दरबारी करत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com