बीडच्या आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पुन्हा बांधण्यात येणार
बीडच्या आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पुन्हा बांधन्यात येणारविनोद जिरे

बीडच्या आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पुन्हा बांधण्यात येणार

बीडच्या धारूर तालुक्यात असणाऱ्या, आरणवाडी येथील साठवण तलावाचा सांडवा फोडल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

बीड - बीडच्या धारूर तालुक्यात असणाऱ्या, आरणवाडी येथील साठवण तलावाचा सांडवा फोडल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तर या तलावाचा सांडवा तलावा लगत असणारा रस्ता वाहून जाऊ नये, म्हणून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

हे देखील पहा -

तर या प्रकरणी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यासह एमएसआरडीसीच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा. यासाठी गावकऱ्यांनी दोन दिवसापूर्वी रास्तारोको देखील केला होता.

बीडच्या आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पुन्हा बांधन्यात येणार
कोरोना काळात 'ती'चा प्रेरणादायी संघर्ष!

दरम्यान हा सांडवा केवळ तलावाखाली असणाऱ्या पाच गावांना धोका निर्माण होऊ नये, म्हणून फोडण्यात आला आहे. कारण की हा तलाव यंदा बांधण्यात आला असून केवळ दोन पावसातच तलाव शंभर टक्के भरल्याने भविष्याच्या दृष्टीने सांडवा फोडण्यात आलाय. मात्र येणाऱ्या काही दिवसात पुन्हा सांडवा बांधण्यात येईल. असे स्पष्टीकरण पाठबंधारे विभागाचे अभियंता उमेश वानखेडे यांनी दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com