चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट नदीपात्रात; सुदैवाने जीवित हानी टळली

शहादा पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीच्‍या पुलाला संरक्षण कठडे व जीवघेणे खड्डे पडल्याने अपघात
चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट नदीपात्रात; सुदैवाने जीवित हानी टळली
Accident NewsSaam tv

नंदुरबार - शहादा पाडळदा रस्त्या वरील गोमाई नदीच्‍या पुलाखाली नदी पात्रात अप्रोन काँक्रीट पूर्णपणे निघाले असून मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत तसेच पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वारंवार अपघात (Accident) घडत आहे. चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक थेट नदीपात्रात कोसळला आहे. यात ट्रक चक्काचूर झाला असून चालक व सहकारी जखमी झाले आहे.

हे देखील पाहा -

गोमाई नदीच्‍या नदीपात्रातील अप्रोन काँक्रिटीकरण दुरुस्ती करावी तसेच संरक्षक कठडे देखील उभारण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न केल्यास जनआंदोलन उभे करू असा इशारा दिला आहे.

Accident News
मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या मुलीचा धरणाच्या डाेहात बुडून मृत्यू; भागवत कुटुंबावर शाेककळा

गेल्या पंचवीस वर्षापूर्वी पाडळदा रस्त्यावर गोमाई नदीपात्रात कमी उंचीच्या पुलाचे काम करण्यात आल्याने अपघात घडत आहे. आतापर्यंत या ठिकाणी सहा नागरिकांचा अपघातामुळे मृत्यू झाला आहे. 40 पेक्षा अधिक गावांचा संपर्क असलेल्या या पुलाला संबंधित विभागाने दुरुस्त करावी. आणखी किती वेळ प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे आणखी किती बळी जातील याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पुल कमी उंचीच्या असल्यामुळे पावसाळ्यात मोठा पूर आल्यावर दोन्ही बाजूंची वाहने तासनतास खोळंबली जातात. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com