Pune: मद्यपी वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट धरणात; गावकऱ्यांच्या सतर्कतेने टळला मोठा अनर्थ

वाहन चालकाने मद्यपान करून वाहन चालवल्याने हा अपघात झाला आहे.
Pune
PuneSaam TV

Pune: नवं वर्षाचे स्वगत सर्वत्र मोठ्या जल्लोषात आणि आनंदात करण्यात आले. अशात आनंद साजरा करत घरी जाणाऱ्या एका मद्यधुंद व्यक्तीचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट धरणात कोसळली आहे. कार धरणात पडल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी चौघांना सुखरूप बाहेर काढले आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, भिमाशंकर रोडवरील चासकमान धरणात हा अपघात झाला आहे. धरणाशेजारी असलेल्या एका हॉटेलमध्ये चार मित्र पार्टी करत होते. पार्टी झाल्यावर ते घरी निघाले. आपल्या चार चाकी वाहनाने ते भीमाशंकरहून राजगूरुनगरच्या दिशेने जात होते. इको कारमधून घरी जात असताना रस्त्यावर खूप अंधार होता. तसेच रस्ता नागमोडी वळणाचा होता. त्यामुळे वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

Pune
Pune | पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय संस्था आता शाखा म्हणून काम करणार!, पाहा सविस्तर बातमी

कारबरोबर चारही मित्र पाण्यात कोसळले. वाहन चालकाने मद्यपान करून वाहन चालवल्याने हा अपघात झाला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. घटना घडताच स्थानिकांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले. त्यामुळे या चारही जणांचा जीव बचावला आहे. आता कार चासकमान धरणातून क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

३१ डिसेंबरला मद्यपीचा धुडगूस; पोलिसांनी दिला चोप

३१ डिसेंबरच्या रात्री अनेक पद्यपेयींनी धुमाकूळ घातला होता. यात काहींचे प्राण जाताजाता राहिलेत. तर काहींना पोलिसांनी चांगला चोप दिला आहे. नाशिकच्या सिडकोतील त्रिमूर्ती चौकात एका मद्यपीने धुडगूस घातला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला चोप दिला हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस बंदोबस्ताचा मागमूसही नसल्याने मद्यपी तरुणाकडून वाहनचालकांना शिवीगाळ करत धमकी देऊन पैसे मागितल्याचा प्रकार घडला.

दिव्या कार्णीवल सिनेमागृहाजवळ सायंकाळी एका मद्यपी तरुणाने रस्त्यावर आरडाओरडा करत वाहनचालकांना अडवून शिवीगाळ केली. तसेच आपल्याजवळ शस्त्र असल्याचा धाक दाखवत पादचारी आणि वाहनचालकांकडून त्याने पैसे उकळले. अंबड पोलिस ठाण्याकडून तात्काळ तरुणांचा शोध घेत दहशत माजवणाऱ्या भाईला चोप देण्यात आला या घटनेचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झालेय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com