धक्कादायक : शासन निर्णय न पटल्याने ST कर्मचाऱ्याने काचेवरती मारला हात; हाताच्या नसा तुटल्या

या ST कर्मचाऱ्याने रागाच्या भरात थेट काचेच्या खिडकीवरच हात मारल्याने त्यांच्या हाताच्या शिरा तुटल्या.
धक्कादायक : शासन निर्णय न पटल्याने ST कर्मचाऱ्याने काचेवरती मारला हात; हाताच्या नसा तुटल्या
ST StaffSaamTV

जालना : राज्य शासनाने काल मुंबईसह राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीतील निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मात्र शासनाचे निर्णय न पटल्याने जालना आगारातील (Jalna Depot) एका ST वाहकानं रागाच्या भरात काचेच्या खिडकीवर हात मारून सरकारच्या निर्णयावरती रोष व्यक्त केला.

हे देखील पहा -

या कर्मचाऱ्याने रागाच्या भरात थेट काचेच्या खिडकीवरच (ST staff) हात मारल्याने त्यांच्या हाताच्या शिरा तुटल्या आहेत. दरम्यान त्यांच्या हातावरती जालन्यातील खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ST Staff
रेशनच्या दुकानांमध्ये गहू, तांदळासोबत मिळणार साबण, शाम्पू, चहा-पावडर; सरकारचा अध्यादेश

सरकारने कालच्या बैठकीनंतर जो निर्णय जाहीर केला, त्या निर्णयावर नाराज होऊन हे कृत्य केल्याची माहिती या एसटी कर्मचाऱ्याने दिली. भानुदास कस्तुरे असं जखमी झालेल्या व्यक्त करणाऱ्या वाहकाचं नाव आहे. दरम्यान STचे राज्य शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मिटणार नसून कोणत्याही एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा विचारही मनात आणू नये असं आवाहन या वाहकानं एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com