Video : शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह गगनात; रायगडावर लाखोंच्या संख्येने शिवप्रेमी दाखल

Shivrajyabhishek Sohala Raigad : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येत शिवप्रेमींनी हजेरी लावली आहे.
The excitement of Shivrajyabhishek ceremony Millions of Shiva bhaktas flock to Raigad
The excitement of Shivrajyabhishek ceremony Millions of Shiva bhaktas flock to Raigadसचिन कदम

सचिन कदम

रायगड: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा आजच्या दिवशी म्हणजे ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला होता. रायगड (Raigad) किल्ल्यावर जवळपास ६ दिवस म्हणजे १२ जूनपर्यंत हा राज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishekh Sohla) चालला. याच दिनाचे निमित्त साधत शिवप्रेमी दरवर्षी रायगडावर राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करतात. आज (६ जून २०२२) ला रायगड जिल्ह्यातील रायगड गडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक साजरा करण्यासाठी लाखोच्या संख्येत शिवप्रेमींनी हजेरी लावली आहे. ढोल-ताशा आणि तुतारीच्या गजरात जल्लोष करण्यात येत आहे. ढोल-ताशाच्या गजरात तलवारी आणि भगवे झेंडे नाचवत शिवप्रेमी हा उत्सव साजरा करत आहेत. (The excitement of Shivrajyabhishek ceremony Millions of Shiva bhaktas flock to Raigad)

हे देखील पाहा -

यावेळी शिवकालीन वास्तु फुलांनी सजवल्या गेल्या. रायगडावर काही वेळातच युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे आगमन होणार आहे. सर्वांनाच या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिक्षा आहे. सलग दोन वर्षे कोरोना आणि त्यामुळे लागलेला लॉकडाऊन यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा हा निर्बंधांमुळे मोठ्या जल्लोषात साजरा करता आला नाही. मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने रायगडवर शिवभक्तांचा जाणू सागरच उसळला आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे.

शिवराज्याभिषेक सोहळा का साजरा केला जातो?

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

The excitement of Shivrajyabhishek ceremony Millions of Shiva bhaktas flock to Raigad
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील शाळा पुन्हा बंद होणार?, वर्षा गायकवाड म्हणाल्या....

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाला शिवप्रेमी गडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात. शिवराज्याभिषेक दिन हा ६ जूनला सुरु होतो. शिवराज्याभिषेक सोहळा हा सहा दिवस चालला होता १२ जूनला तो पूर्ण झाला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा करण्यात येतो.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com