महसूलमंत्र्यांचा कारखाना देणार मोफत १५ किलो साखर!

साखर
साखरसाम टीव्ही

अहमदनगर ः सहकाराचा आधार घेत अनेक नेत्यांनी कारखाने, दूध संस्था आपल्या नावावर करून घेतल्या. खासगीकरण झाल्याने सहकार चळवळ संपुष्टात आली. सभासद हक्काच्या संस्थेला पारखे झाले. परंतु महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकाराचे सत्त्व अजूनही जपले आहे. सहकारातील संगमनेर तालु्क्यातील संस्था त्यांनी टिकवून ठेवल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनाचा त्याचा फायदा होत आहे.The factory in Thorat will provide 15 kg of free sugar

साखर
मुळा धरण काठोकाठ, पन्नास वर्षांत भरले ३२वेळा

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना सालाबादप्रमाणे दीपावलीनिमित्त मोफत 15 किलो साखर वाटप करण्यात येणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व सभासदांची साखर बिले 14 ऑक्टोबरपर्यंत घरपोहच दिली जाणार आहेत. सर्वांनी 24 ते 29 ऑक्टोबर या काळात साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना गोडावूनमधून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत साखर नेण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले आहे.

थोरात कारखान्याच्यावतीने याही वर्षी सभासदांना साखर वाटप केले जाणार आहे. या बाबत संचालक मंडळाने 30 सप्टेंबर अखेर मंजूर प्रती शेअरला 15 किलो साखर मोफत देण्यास मंजुरी दिली आहे.

या साठी साखर घेण्यासाठीच्या अधिकार पत्रावर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, सेवा संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. सभासदाने स्वत: शासकीय ओळखपत्र बरोबर आणणे आवश्यक असल्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी म्हटले आहे.The factory in Thorat will provide 15 kg of free sugar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com