
भंडारा : भंडाऱ्यात (Bhandara) एका लग्न संमारंभात वाजतगाजत नवरदेव लग्नमंडपात पोहोचला, लग्नाची सर्व तयारी झाली असतानाच अचानक जिल्हा बाल संरक्षण समितीचे (District Child Protection Committee) पथक पोलिसांसह लग्नमंडपात पोहोचले आणि नवरी मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा सादर करीत लग्न मोडल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साई मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी घडली.
भंडारा येथील साई मंगल कार्यालयात बुधवारी एक लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच महिला बालविकास विभागाला (Department of Women Child Development) नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची गोपनिय माहिती मिळाली. मिळालेली माहितीनुसार भंडारा बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली. एक पथक साई मंगल कार्यालयात पोहोचले. दुसरे पथक मुलीने शिक्षण घेतलेल्या शाळेत जन्मतारखेची खातरजमा करण्यासाठी पाठविण्यात आले. तर तिसरे पथक भंडारा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घेऊन लग्नसमारंभात पोहचले.
सकाळच्या सुमारास वाजतगाजत नवरदेव वधूमंडपी पोहोचला, लग्नाची वेळ जवळ आली, मात्र जन्मतारखेचा दाखला मिळण्यास विलंब होत आल्याने कारवाई करता येत नव्हती. शेवटी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुलीच्या आई- वडीलांसह नातेवाइकांची भेट घेत त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. परंतु त्यांनी मुलीची जन्मतारीख १५ एप्रिल २००४ असून मुलगी 18 वर्षांची असल्याचं ठणकावून सांगितलं.
मात्र बाल संरक्षण कक्षाच्या एका पथकाने भंडारा नगर परिषद गाठून मुलीच्या जन्माचा दाखला प्राप्त केला. त्या दाखल्यावरती मुलीची जन्मतारीख ही १५ एप्रिल २००५ होती. त्यामुळे नवरी मुलगी १७ वर्षे १९ दिवसांची असल्याचं आढळून आल्याने हे लग्न मोडण्यात आलं. नवरदेव आणि नवरीला बाल कल्याण समितिपुढे हजर करण्यात आले असून मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करण्याचे लेखी उत्तर दिले आहे. मात्र, लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्यां आपला हिरमोड करत वऱ्हाडींना आल्या पावली परत जावे लागले.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.