दिल्लीतील लढा निवडणुकीपर्यंत, शेतकरी नेत्यांचा निर्धार

दिल्लीतील लढा निवडणुकीपर्यंत, शेतकरी नेत्यांचा निर्धार
New DelhiSaam Tv

अहमदनगर : केंद्रातील भाजपा सरकारने ठरविलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. कॉर्पोरेट धोरणामुळे शेती, रोजगार, दुकानदारी, छोटे व्यवसाय अडचणी येतील. केवळ उद्योजक समाधानी होतील. त्यामुळे जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाही किंवा सरकार माघार घेत नाही. तोपर्यंत दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरू राहील.

पुढील लोकसभा निवडणूक असो अथवा त्यापुढेही दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरू ठेवण्याची आंदोलकांची तयारी असल्याचा इशारा पंजाब किसान संघटनेचे उपाध्यक्ष सुखदर्शनसिंग नठ यांनी व्यक्त केला. The farmers' agitation in Delhi will continue till the Lok Sabha elections abn79

येथील शासकीय विश्रामगृहात श्रमिक शेतकरी संघटना, सत्यशोधक शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभा आयोजित पत्रकार परिषदेचे सुखदर्शनसिंग नठ बोलत होते.

New Delhi
रोहित पवार म्हणतात, यामुळेच कर्जत-जामखेडकरांचा अभिमान वाटतो

या प्रसंगी माले (बिहार) विधानसभेचे भाकपचे आमदार सुदामा प्रसाद, सत्यशोधक शेतकरी सभेचे संघटक किशोर ढमाले, सचिव करणसिंग कोकणी, श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बावके, सचिव सुभाष काकुस्ते उपस्थित होते.

केंद्रातील भाजपा सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात प्रथमच देशातील शेतकरी सर्वांना संघटित करीत आहेत. हे कायदे मागे घेण्यासाठी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. बंदला सर्वस्तरातून पाठिंबा मिळाल्याने हा देशव्यापी बंद निश्‍चित यशस्वी होणार असल्याची अपेक्षा राजाराम सिंग यांनी येथे व्यक्त केली.

सिंग म्हणाले, उत्पादन, साठवणूक व वितरणावर कार्पोरेट घराण्यांच्या मक्‍तेदारीला केंद्र सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. आधी अंबानी-अदानीचे गोदामे तयार केली व नंतर कायदे केले गेल्याचे प्रथमच निदर्शनास आले. यातून एकच सिद्ध होते. ज्या दिवशी धान्याचा बाजार कॉर्पोरेट जगताच्या ताब्यात जाईल. त्यावेळी पेट्रोल-डिझेल प्रमाणे दररोज अन्नधान्याचे दर वाढतील. त्यामुळे त्यास आताच विरोध करण्याची आवश्‍यकता आहे. कृषी कायदे सरकारला मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी रोजी होणाऱ्या आंदोलनाला सर्वस्तरातून पाठिंबा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी कृषी क्षेत्राने भारताला मंदीपासून वाचविण्याचे स्पष्ट केले होते. ही शेतकऱ्यांची ताकद आहेत. कृषी क्षेत्र उद्योजकांच्या ताब्यात गेल्यास देशात मंदी येईल. परिणामी, सरकारच्या निर्णयामुळे देशात केवळ भूकबळी वाढणार असल्याचा आरोप त्यांनी केला.The farmers' agitation in Delhi will continue till the Lok Sabha elections abn79

Related Stories

No stories found.