राज्यातली एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई आजपासून सुरु

पहिली बस आणि आजची शिवाई बस या मध्ये जमीन आसमानचा फरक झाल्याचे पहिल्या एसटी बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांनी सांगितले.
Shivai Electric Bus
Shivai Electric BusSaam Tv

अहमदनगर -1 जून 1948 ला पहिली एसटी बस ही नगर ते पुणे धावली आणि आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शिवाई ही पहिली विद्युत प्रणाली वरील बसचे लोकार्पण सोहोळा अहमदनगर आणि पुणे येथून संपन्न झाला. शिवाई या पहिल्या विद्युत प्रणालीवरील बस आज नगर ते पुणे धावली. या बसला हिरवा झेंडा 1 जून 1948 प्रथम बस वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते दाखवण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते .

शिवाई ही पहिली विद्युत प्रणाली बस नगर ते पुणे तारकपुर या बस स्थानकातून सोडण्यात आली आहे. पहिली बस ही पोलीस प्रोटेक्शन मध्ये नगर ते पुणे धावली. पहिल्या बसला तिकीट फक्त 2 रुपये 50 पैसे होते. पहिली बस आणि आजची शिवाई बस या मध्ये जमीन आसमानचा फरक झाल्याचे पहिल्या एसटी बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांनी सांगितले.

सामान्य लोकांना करता दळणवळणाचे हे महत्त्वाचे साधन आहे.या लाल परिला 74 वर्ष पूर्ण होत असून ती आता 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यावेळी शिवाय या इलेक्ट्रिक बसचे शुभारंभ होत आहे. त्याचा मनस्वी आनंद होत असल्याचं जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

पूर्वीच्या बस चालवताना जो त्रास वाहन चालकांना होत होता तो या इलेक्ट्रिक बस मध्ये नसून ही बस वातानुकूलित आहे. त्यामुळे बस मधील प्रवाशांसह वाहन चालक आणि बस वाहक यांना देखील आराम दायक प्रवास करायला मिळणार आहे.

1 जून 1948 ला पहिली बस नगर ते पुणे धावली आणि त्याचेच औचित्य साधून शिवाई ही पहिली इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहे. पुणे ते नगर या बस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर नगर ते पुणे या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.

Shivai Electric Bus
दुकान फाेडणारा चाेरटा जेरबंद; पंचवटी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

ही बस प्रदुषण विरहीत असून ड्रायव्हर अलार्म यंत्रणा या बस मध्ये बसलवल्याचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी सांगितले. एस टी बस म्हांटल की डोळ्या समोर उभी राहते ती लाल कलरची बस. लालपरीला आज 74 वर्ष पूर्ण झालीत. खेड्यात तसे शहरात लोकांनी बसला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. डिझेल बस ते आता इलेक्ट्रिक बस असा प्रवास आता सुरू झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com