'मृत्यूचा बदला घेणार'.. पोलिसांच्या कारवाईनंतर नक्षल्यांची पहिलीच प्रतिक्रिया

मारले गेलेल्या नक्षल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बंद पाळण्याच आवाहन करत एक पत्रक जारी करण्यात आलं आहे.
'मृत्यूचा बदला घेणार'.. पोलिसांच्या कारवाईनंतर नक्षल्यांची पहिलीच प्रतिक्रिया
Naxals SaamTV

गडचिरोली : काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) गडचिरोलीच्या ग्यारापत्ती (Gyarapatti of Gadchiroli) चकमकीत जवळपास 27 नक्षली मारले होते. आणि त्याच मारले गेलेल्या नक्षल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बंद पाळण्याच आवाहन करत एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. पोलिस आणि नक्षल्यांच्या चकमकीनंतरची ही पहिलीच प्रतिक्रिया नक्षलवाद्यानी दिली आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (Communist Party of India) माओवादीचा केंद्रीय कमिटी प्रवक्ता अभय याच्या नावे पत्रक जारी केले गेले आहे. मृत दीपक अर्थात मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) याला पत्रकात जनयोद्धा संबोधले आहे. (The first reaction of the Naxals after the police action)

हे देखील पहा -

तसेच 27 नोव्हेंबर रोजी बंद पाळून मृत नक्षल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ (In memory) सभा आयोजित करण्याचे आवाहन नक्षल्यानी केले आहे. नक्षल्यांचा बंद (Maharashtra, Chhattisgarh, Odisha, Telangana, Andhra Pradesh) राज्यात आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकात मिलिंद तेलतुंबडे यांनी केलेल्या जंगल आणि शहरी क्षेत्रातील नक्षली आंदोलनाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Naxals
मोदींनी लाल किल्ल्यावरून 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी - संजय राऊत

1992 साली मिलिंद पूर्ण नक्षली आंदोलनात सक्रिय झाल्याचे सांगत 2005 मध्ये मिलिंदने कामगार-आदिवासीबहुल चंद्रपुरात सर्वस्तरात नक्षली आंदोलनाला मिळविलेल्या समर्थनाचा उल्लेख केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीना उध्वस्त करणाऱ्या खाणीविरोधात मिलिंदने जनमत एकत्रित केल्याची कबुली पत्रकातून दिली गेली आहे. मिलिंद आणि अन्य नक्षली यांच्या मृत्यूने आंदोलनाची मोठी हानी झाल्याचा उल्लेख पत्रकात असून मोठ्या चकमकीनंतर जारी होणाऱ्या पत्रकात पोलिसांना दोष देण्याची असलेली भाषा ताज्या पत्रात नसल्याने यंत्रणांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या मृत्यूचा नक्षली बदला घेतील हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com