विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पहिल्यांदाच होणार स्ट्रक्चरल ऑडिट

पुरातत्व विभाग आणि मंदिर समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पहिल्यांदाच होणार स्ट्रक्चरल ऑडिट
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पहिल्यांदाच होणार स्ट्रक्चरल ऑडिट भारत नागणे

भारत नागणे

पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे मुळ स्वरुपातील सौंदर्य अबाधित ठेवत, मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

संपूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रथमच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये संत नामदेव पायरी पासून विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंतच्या मुळ मंदिरामध्ये आवश्यक ते बदल देखील केले जाणार आहेत. यासाठी पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. The first structural audit of Vitthal-Rukmini temple will be held

संत नामदेव पायरीचे देखील सुशोभीकरण केले जाणार आहे, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची आज येथील नवीन भक्त निवासामध्ये बैठक झाली.

बैठकीमध्ये मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या संदर्भात येत्या 12 जुलै रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे पुरातन आहे, मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मंदिर कोणी आणि कधी बांधले याबाबतची ठोस अशी माहिती उपलब्ध नाही.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पहिल्यांदाच होणार स्ट्रक्चरल ऑडिट
साताऱ्यानंतर आता वाई मधील व्यापारी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर

परंतु बांधकाम कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या मंदिराचा ऐतिहासीक ठेवा पुढील अनेक वर्षे जतन करण्यासाठी मंदिर समितीने आवश्यक ती पाऊले उचलली आहेत. मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी यापूर्वीच पुरातत्व विभागाने अनेक बदल सुचवले आहेत. त्यानुसार मंदिर समितीने मंदिरातील व देवाच्या गाभाऱ्यात आवश्यक ते बदल देखील केले आहेत.

आणखी काही बदल सुचवले तर ते करण्यासाठी संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संत नामदेव पायरीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण मह्त्व आहे. पंढरपुराला येणारा प्रत्येक भाविक संत नामदेव पायरीचे दर्शन घेवूनच परत जातो. येथील संत नामदेव पायरीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सुशोभीकरण करण्य़ाचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

बैठकीला मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, साधना भोसले, मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे अधिकारी वाहणे आदी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com