धक्कादायक! तळवट धरणाचे दरवाजे अज्ञातानं उघडले; लाखो लिटर पाणी वाया, धरणाची सुरक्षा रामभरोसे...

Talvat Dam Ratnagiri: धक्कादायक बाब म्हणजे या धरणावर सुरक्षारक्षकच नेमलेला नाही.
Talvat Dam Ratnagiri
Talvat Dam Ratnagiriजितेश कोळी

जितेश कोळी,रत्नागिरी

Talvat Dam News: रत्नागिरीतील खेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खेड तालुक्यातील तळवट धरणाचे (Dam) दरवाजे अज्ञाताने उघडले आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या धरणावर सुरक्षारक्षकच नेमलेला नाही. त्यामुळे अज्ञाताला सहज हे कृत्य करणे शक्य झाले. (Khed Latest News)

Talvat Dam Ratnagiri
Politics: राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; मुंबई-औरंगाबादेत जोरदार निदर्शनं

मिळालेल्या माहितीनुसार, या धरणाचे दरवाजे उघडण्याच्या ठिकाणी असणारे कुलूप एक आठवड्यापूर्वी अज्ञाताने तोडले होते, आणि अज्ञाताने धरणाचे दरवाजे अर्धवट उघडले होते. सध्या एका खासगी कंपनीकडून या धरणाच्या उघडलेल्या दरवाजाचे वेल्डिंग करून ते बंद करण्याचे प्रयत्न पाटबंधारे विभागाकडून केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी ढेरे यांनी दिली आहे.

Talvat Dam Ratnagiri
छत्रपतींनी औरंगजेबाची ५ वेळा माफी मागितली होती; भाजप खासदाराच्या विधानावर जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले...

या प्रकरणी गेल्या आठवड्यात खेड (Khed) पोलीस स्थानकामध्ये घटलेल्या प्रकाराबाबत लेखी पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. धरणाचे दरवाजे उघडणाऱ्या अज्ञातांचा शोध घेण्याचे पोलिसांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या धरणावर नव्याने कुलूप बसवण्यात आले असून लवकरच धरणाचे दरवाजे बंद केले जातील असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, धरणासारख्या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसल्याने धरणाची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचं दिसतंय. पुढे काही दुर्देवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतो.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com