माय-लेकीचा होता प्रेमाचा "धंदा", अडकल्यास जिवाला मुकाल

माय-लेकीचा होता प्रेमाचा "धंदा", अडकल्यास जिवाला मुकाल
क्राईम

अहमदनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हनी ट्रॅपचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. प्रेमाचे नाटक करून शरीरसंबंधासाठी समोरच्या व्यक्तीला भाग पाडायचे आणि त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करायचे असा हा प्रकार आहे. नगर तालुक्यातील एका महिलेने अनेकजणांचा असा गंडा घातला होता. त्या महिलेचा पर्दाफाश झाला आहे. तिने एका अधिकाऱ्यालाही असेच प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं.The girl cheated by pretending to be in love

मागील महिन्यात समोर आलेलं प्रकरण अकोले तालुक्यातील होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्याला शरीरसंबंध करण्यास भाग पाडलं. त्याचे चित्रिकरणही त्या महिलेने केले. त्याच्या आधारे त्या शेतकऱ्याकडून पैसे उकळण्यात येत होते. त्याने वैतागून पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर दुसऱ्या एका घटनेत माय-लेकीनेच प्रेमाचा धंदा मांडला होता. लेकीच्या प्रियकराने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.

क्राईम
काँग्रेस नेता ः मी विनयभंग केलाय? थांबा, सीडी लावतो!

अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील सुमित मंगेश शिर्के या तरूणाच्या आत्महत्येला संबंधित माय-लेकीला जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यानुसार अकोल्यात संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीच्या माय-लेकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित हा पेशाने इंजिनिअर होता. त्याचे एका मुलीवर प्रेम जडले होते. पाच-सहा महिन्यांच्या प्रेमानंतर प्रेयसीने तिचे रंग दाखवायला सुरवात केली. ती सुमितकडे पैशाची मागणी करू लागली. सुरूवातीला त्याने मोठ्या आनंदाने मदत केली. नंतर तिची मागणी वाढत गेली. प्रेयसीनंतर तिची आईही पैसे मागू लागली.

कोरोना काळात सुमितची आर्थिक स्थिती खालावली. त्या मुलीच्या आईचा पैसे मागण्याचा रेटा वाढत गेला. सुमित पैसे देत नाही असे लक्षात आल्यावर त्या महिलेने सुमितच्या घरी जाऊन राडा केला. ५० हजार दिले नाही तर तुम्हाला कोर्टात खेचील, असाही दम भरला. त्यामुळे सुमितवर मानसिक तणाव आला.The girl cheated by pretending to be in love

प्रेयसी आणि तिच्या आईला देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, तसेच समाजात बदनामी होईल, हा विचार त्याला खात होता. त्यातून त्याने आत्महत्या केली. त्याच्या प्रेयसीने विहिरीचा फोटो पाठवून आत्महत्येची धमकी दिली होती. त्या भीतीपोटीही सुमितीने हे पाऊल उचलले असल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. तशी फिर्याद संबंधित माय-लेकीच्या विरोधात दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०६,३४प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याकडे हा तपास आहे.

सोशल मीडियातील मैत्री टाळा

सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रेमाची भाषा करून पैसे उकळले जातात. काहीजण याविषयी तक्रारही देण्यास धजावत नाहीत. त्यामुळे वेळीच सावध राहिले पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com