हृदयद्रावक घटना ! मुलीला टीव्हीवर कार्टून लाऊन दिलं अन गळफास घेत जीवन संपवलं; आईनं का उचललं टोकाचं पाऊल?

२ वर्षांच लहान बाळ असताना देखील तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
Crime News
Crime Newssaam tv

Aurangabad News: औरंगाबादमध्ये एक हृदय हेलावणारी घटना घडाली आहे. एका विवाहीत महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. २ वर्षांच लहान बाळ असताना देखील तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. महीलेने असे टोकाचे पाऊल नेमके का उचलेले हे अद्याप समजले नाही. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पती नोकरीवर गेल्यानंतर महिलेने आत्महत्या केली आहे. यावेळी तिने आपल्या २ वर्षांच्या मुलीला टीव्हीवर कार्टून लाऊन दिले आणि ती बेडरूममध्ये गेली. इथे तिने स्वत:ला गळफास लाऊन घेतला. थोड्यावेळाने मुलगी आई कुठे आहे पाहू लागली आणि बेडरूममध्ये पोहचली. आईला अशा अवस्थेत पाहून त्या लहानगीला नेमके काय घडले आहे हे देखील समजले नाही.

Crime News
Crime News: किरकोळ वादातून शेजारीला जीवे मारले

मात्र काहीतरी चुकीचे घडले आहे असे तिच्या लक्षात आले आणि ती खाली बसून जोरजोरात रडू लागली. मुलीचं रडणं ऐकूण आई नेहमीच तिला जवळ घेत होती. मात्र यावेळी तसं काही झालंच नाही. आई बरोबर काय घडलंय, आई आता या जगात नाही हे काहीच चिमुकलीला समजत नव्हते. पण आईने आपल्याला घ्यावे यासाठी ती बराच वेळ रडत राहिली.

Crime News
Aurangabad | उंदराने Xerox मशीनची केबल खाल्याने, विद्यापिठाच्या पदव्युत्तर परीक्षेत गोंधळ

मुलीच्या रडण्याचा आवाज शेजारी देखील ऐकत होते. तिची तब्येत ठिक नसल्याने ती रडत असावी असे त्यांना सुरूवातीला वाटले. मात्र रडण्याचा आवाज काही थांबत नव्हता. चिमुकली खूप वेळची जोरजोरात रडत होती. त्यामुळे काहीतरी गडबड आहे म्हणून शेजारी महिलेच्या घरी पोहचले. इथे त्यांनी चिमुकलीचा आवाज घेत बेडरूममध्ये पोहचले. बेडरूममधलं दृश्य पाहून सर्वाच्याच काळजाचा थरकाप उडाला. त्यांनी लगेचच बाळाला तेथून उचलून बाहेर आणले आणि पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. ही घटना औरंगाबाद शहरातील आनंदनगर भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com