ग्रामपंचायतींचे वीजबिल, पाणीपट्टी सरकारच भरणार

पैसे
पैसेSaam Tv

अहमदनगर ः पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे व पाणी पुरवठा योजनेची मिळून सुमारे 51 कोटी 54 लाख रूपयांची थकबाकी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी अनेक ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या भरणे शक्य नाही. आता फेब्रुवारी अखेरची थकबाकी सरकारने भरण्याची तयारी दाखविल्याने तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींची सुमारे 51 कोटी रूपये वाचणार आहेत. त्यामुळे या गावांना हा पैसा आता विविध विकास कामांसाठी खर्च करता येणार आहे.The government will pay the Gram Panchayat bill abn79

मध्यंतरी गत महिन्यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे पथदिवे व पाणीपुरवठा योजनेच्या बिलांची थकबाकी खूपच वाढली होती. त्यामुळे विजवितरण कंपनीने या गावातील पथदिव्यांचे विजजोड खंडित केले होते. पाणी योजना अत्यावश्यक असल्याने त्यांचे जोड मात्र थकबाकी असूनही तोडले नव्हते. मात्र, पथदिव्यांचे जोड तोडल्याने अनेक गावांतील रस्ते अंधकारमय झाले होते. त्याचा ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.

पैसे
कर्जत-जामखेड पुन्हा चर्चेत! पवार-शिंदेंचा पुन्हा सामना

या पूर्वी पथदिवे व पाणी योजनांची बिले जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात येत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीची ही बिले मोठ्या प्रमाणात थकली होती. ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून ही विज बिले भरावीत, असेही आदेशाद्वारे कळविण्यात आले. मात्र, अनेक छोट्या ग्रामपंचायतींच्या थकबाकी इतका निधी 15 व्या वि-त आयोगातूनही त्यांना मिळत नसल्याने त्यांनी ही थकबाकी कशी भरावी ही चिंता त्या ग्रामपंचायतींना होती. या ग्रामपंचायतींनी ही बिले 15 व्या वित्त आयोगाचा निधीतून भरली तर गावातील विविध विकास कामांसाठी त्यांना निधीच शल्लक राहाणार नसल्याने अनेक ग्रमपंचायतीमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र, आता नव्याने सरकारने फेब्रुवारी अखेरची थकबाकी सरकारच्या वतीने भरण्याचा निर्णय घेतला असल्याने ग्रामपंचायतीमधून आनंद व्यक्त होत आहे.The government will pay the Gram Panchayat bill abn79

तालुक्यात 114 गावे आहेत. या गावातील पथदिव्यांची सुमारे 40 कोटी 96 लाख रूपये तर तर पाणी पुरवठा योजनेचे सुमारे 10 कोटी 58 लाख रूपयांची थकबाकी आहे. आता फेब्रुवारी अखेरची बिले सरकार भरणार आहे. मात्र, त्या नंतर म्हणजे मार्चनंतरची बिले या पुढील काळात ग्रामपंचायतींना भरावी लागणार आहेत. पथदिवे व पाणी योजनांची बिले सरकारी पातळीवरच कायमच भरावीत. अनेक छोट्या गावांना विकास निधी खूपच तुटपुंजा मिळतो. त्यामुळे ही बिले जर ग्रामपंचायतींनी भरली तर त्या ग्रामपंचयतींच्या विकासावर परिणाम होईल. गावाचा विकास करता येणार नाही.

- बाळासाहेब रेपाळे, पुणेवाडी, सरपंच.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com