Crime : लातूरचे गुटखा किंग हादरले; सव्वा कोटींचा गुटखा जप्त! पहा Video
Crime : लातूरचे गुटखा किंग हादरले; सव्वा कोटींचा गुटखा जप्त! दीपक क्षीरसागर

Crime : लातूरचे गुटखा किंग हादरले; सव्वा कोटींचा गुटखा जप्त! पहा Video

गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरांमध्ये छुप्या मार्गाने गोवा आणि अन्य गुटखा विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा मोठा धुमाकूळ वाढला होता. यावर पोलीस प्रशासनाचा अंकुश ठेवणं कठीण झाले होते.

लातूर : गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरांमध्ये छुप्या मार्गाने गोवा आणि अन्य गुटखा विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा मोठा धुमाकूळ वाढला होता. यावर पोलीस प्रशासनाचा अंकुश ठेवणं कठीण झाले होते. पण, लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याविरुद्ध मोहीम उघडली यावर देखील गुटखा किंगने विविध प्रकारच्या क्लुप्त्या वापरून आपला गुटख्याचा धंदा जोमात सुरू ठेवला होता.

यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुप्त माहितीच्या आधारे पथक तयार केले. उपविभागीय पथकाने कारवाई करून जवळपास एक करोड पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई केली. यामध्ये प्रेम मोरे सावकार यासह आणि एकाचा समावेश असल्याचं सांगण्यात येते.

Crime : लातूरचे गुटखा किंग हादरले; सव्वा कोटींचा गुटखा जप्त!
जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या : एकनाथ शिंदे

लातूर शहरातील गांधी पोलीस ठाणे आणि MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणावर धाडी टाकून किमान सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. यातील 3 प्रमुख आरोपी फरार असून त्यासाठी दोन पथकांची स्थापना केली आहे. या तिन्ही फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे, असं पोलिसांनी सांगितले आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये शहरांमध्ये अवैध धंद्यावर आळा बसण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतील असे पोलीस उपविभागीय अधिकारी निकेतन कदम यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.