कोरोनात गुळवेल ठरली संजीवनी, लागवडीसाठी मोदी सरकारचा पुढाकार

गुळवेल
गुळवेलगुगलवर

अहमदनगर ः कोरोना काळात घरोघरी वैद्य निर्माण झाले होते. अमूक काढा घेतला की आराम पडेल, तमूक वनस्पती खाल्ली की प्रतिकार शक्ती वाढेल, मांसाहार करणाऱ्यांना कोरोना फार त्रास देत नाही, असे काही काही निरीक्षण असायचं. त्याला शास्त्रीय आधार किती हे डॉक्टरच जाणोत. मालेगावचा काढा सर्वात फेमस झाला होता. गुलवेलीनेही चांगलेच मार्केट खाल्ले होते. प्रत्येकजण आयुर्वेदाच्या मागे लागला. याच काळात ही वनस्पती प्रकाशझोतात आली.

केंद्र सरकारनेही आपल्या देशी वनस्पती आणि उपचारांना महत्त्व दिलं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ आयुष मंत्रालय व पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने पुढाकार घेत एक मोहीम राबविली. गुळवेल या औषधी वनस्पतीची रोपे तयार करून विद्यार्थी तसेच महाविद्यालयांनाही आत्मनिर्भर केलं.The importance of Gulveli in the Corona period

गुळवेल
ऊसाचे हे वाण शेतकऱ्यांना करील समृद्ध

पारनेर महाविद्यालयाने सुमारे 10 हजारावर गुळवेलीचे रोपे तयार केली आहेत. या रोपांच्या विक्रीतून सुमारे 50 हजार रूपयांचे उत्पन्नही मिळवले आहे. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

पारनेर महाविद्यालयाने 10 हजारांवर रोपे तयार केली. त्यातील काही रोपांची विक्री करून सुमारे 50 हजार रूपयांचे उत्पन्नही मिळवले. महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर, पर्यावरण पूरक वातावरण आणि तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुळवेल वाढवली.

या निमित्ताने तालुक्यात गुळवेल या औषधी वनस्पतीची ओळख होत आहे. ही वनस्पती पाहण्यासाठी लोक महाविद्यालयात येत आहेत. भविष्यकाळात गुळवेलाचे औषधी महत्व वाढणार असल्याने महाविद्यालयाने उचललेले पाऊल महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद आहे.

महाविद्यालय नेहमी समाज व विद्यार्थी हित लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविते. हा उपक्रम समाजापर्यंत जावा आणि समाजातील नागरिकांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा हीच आमची भावना असते. या कामी उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, विभागप्रमुख डॉ.रवींद्र देशमुख यांनी रोपे तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. सजन खपके, प्रा. राणी शेख, प्रा. भारत चौधरी, प्रा. तुषार चिकणे, प्रा. रमा शिंदे, प्रा. रिहाना शेख, प्रा. तुषार जगदाळे यांनी परिश्रम घेतले.The importance of Gulveli in the Corona period

काय आहे फायदे

कोरोनात काळात गुळवेल या वनस्पतीच्या काड्यांचा काढा करून पिल्यास आराम पडतो. प्रतिकार शक्तीही वाढते. गुळवेलीच्या काढ्याने खोकलाही जातो. ग्रामीण तसेच शहरी भागातही या गुळवेलीने लोकांना संजीवनी मिळाल्याचा दावा जाणकार करतात.

Edited By - Ashok Nimbalkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com