ईडीकडून दुसऱ्या दिवशीही जालना बाजार समितीत झाडाझडती सुरु!

ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकरांच्या घरी शिवसैनिकांची बैठक...
ईडीकडून दुसऱ्या दिवशीही जालना बाजार समितीत झाडाझडती सुरु!
ईडीकडून दुसऱ्या दिवशीही जालना बाजार समितीत झाडाझडती सुरु!लक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) सभापती असलेल्या जालना बाजार समितीत आज दुसऱ्या दिवशी देखील ईडीच्या (ED) पथकाने झाडाझडती घेणं सुरूच ठेवलं आहे. काल ईडीच्या पथकाने अर्जुन खोतकर यांच्या घरासह कार्यालय आणि बाजार समिती कार्यालयाची झाडाझडती घेतली होती. तर रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत अर्जुन खोतकर यांची ईडीच्या पथकाकडून तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली होती.

हे देखील पहा-

दरम्यान, खोतकर यांच्यावर ईडीची कारवाई सुरूच असल्यानं आज खोतकर यांच्या घरी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात गोळा झाले आहेत. या शिवसैनिकांसोबत खोतकर यांनी बैठक घेतली असून शिवसैनिकांशी चर्चा केली आहे. या बैठकीला शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते देखील उपस्थित आहेत.

ईडीकडून दुसऱ्या दिवशीही जालना बाजार समितीत झाडाझडती सुरु!
मोठी बातमी: शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी...

दरम्यान, काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या 12 तासांच्या चौकशीत, ED पथकाकडून अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या कृषी उत्पन्न बाजर समितीच्या खोतकर बिजनेस सेंटर येथील कार्यालयाची झाडा झडती घेण्यात आली होती. यावेळी पथकाकडून काही कागदपत्रंही तपासण्यात आली, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजर समितीच्या कार्यालयातही ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी खोतकर बिजनेस सेंटर उभारण्यासाठी कृषी उत्पन्न बाजर समितीकडून देण्यात आलेला ठराव, बिजनेस सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या गाळ्याच्या लिलावाच्या व्यवहाराचे कागदपत्रंही तपासण्यात आली. दुपारी दोनच्या सुमारास ईडीचे पथक अर्जुन खोतकर यांचं निवास्थान असलेल्या दर्शना बंगल्यावर दाखल झालं. या ठिकाणी पथकाकडून अनेक कागदपत्रांची ही तपासणी केल्याची माहिती समोर आली होती.

तर, शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. खोतकर यांनी जालनामधील साखर कारखान्याच्या विक्रीमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) केला होता.

Edited By-Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com