हौसेला मोल नाही ! नववधूने चक्क गाडीच्या बॉनेट वर बसून केला प्रवास

आपला लग्न सोहळा जरा हटके व्हावा यासाठी प्रत्येक नवं विवाहित जोडपी काही ना काही वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र हे प्रयत्न करत असताना काही अतिउत्साही जोडप्यांना चक्क कायद्याच्या धाकाचाही विसर पडतो.
हौसेला मोल नाही ! नववधूने चक्क गाडीच्या बॉनेट वर बसून केला प्रवास
हौसेला मोल नाही ! नववधूने चक्क गाडीच्या बॉनेट वर बसून केला प्रवासSaamTv

पुणे : आपला लग्न सोहळा जरा हटके व्हावा यासाठी प्रत्येक नवं विवाहित जोडपी काही ना काही वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र हे प्रयत्न करत असताना काही अतिउत्साही जोडप्यांना चक्क कायद्याच्या धाकाचाही विसर पडतो. The journey of the bride sitting on the bonnet of car

पुण्यातील दिवे घाटात देखिल अशीच एका नववधू आणि तिच्या लग्नाच्या वर्हाड्यांनी कायद्याची पायमल्ली केली आहे. पुण्यातील भोसरी परिसरात राहणारी ही नवरी मुलगी चक्क स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाच्या बॉनेटवर बसून लग्नाचा प्रवास केला आहे.

हे देखील पहा -

नवरीने लग्नाच्या बोहल्यानर चढण्यासाठी चारचाकी गाडीच्या बोनवट बसुन मिरवत थेट दिवे घाटातून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला आहे. प्रवास करत असताना नवरी मुलीचं व्हिडिओशूट देखील करण्यात आलं आहे.

सासवड जवळील एका मंगल कार्यालयात आज या नवरी मुलीचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. मात्र या अतिउत्साही नवरी आणि तिच्या कुटुंबियांना चक्क कायद्याचा धाकाचा विसर पडला आणि त्यांनी अतिशय धोकादायक रीतीने प्रवास करून स्वतःच्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण केला.

हौसेला मोल नाही ! नववधूने चक्क गाडीच्या बॉनेट वर बसून केला प्रवास
सांगलीतील निर्बंध आणखी कडक होणार

गाडीच्या बॉनेटवर बसून बोहल्यावर चढायला जाणे हा या नवरी मुलीला चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी नवरी मुलगी आणि तिच्या गाडीच्या ड्रायवरसह इतर काही वर्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.

लग्न सोहळा आयुष्यातील एक अविस्मरणीय सोहळा आहे आणि तो सोहळा नेहमी आठवणीत राहावा यासाठी वधू-वरांनी आपल्या आठवणी तयार करायला कोणाचा काही विरोध नसतोच. मात्र, स्वतःच्या आठवणी तयार करताना, आपण काळाच्या आठवणीत हरवणार नाही ना ? याचे भान देखील या वधू-वरांना असणं तितकंच गरजेचं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com