मुरुड येथील काशीद पूल कोसळला; वाहतूक विस्कळीत

अलिबाग मुरुड रस्त्यावर एक जुना पूल कोसळल्याची धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे.
मुरुड येथील काशीद पूल कोसळला; वाहतूक विस्कळीत
मुरुड येथील काशीद पूल कोसळला; वाहतूक विस्कळीतSaam Tv

रायगड : अलिबाग Alibag मुरुड Murud रस्त्यावर एक जुना पूल कोसळल्याची धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. काशीद Kashid येथील नाल्यावर हा पूल कोसळल्याने १ कार आणि मोटार सायकल अशी २ वाहने अडकली होती. अडकलेली २ वाहने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. वाहनांमधील ६ प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. The Kashid bridge at Murud collapsed

हे देखील पहा-

मात्र, यापैकी १ प्रवाशाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू Death झाले आहे. या दुर्घटनेनंतर मुरुडकडे जाणाऱ्या- येणाऱ्या वाहने रोहा सुपेगाव Roha Supegaon मार्गे वळवण्यात आली आहेत. प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केल आहे. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुरुड तालुक्यात पावसाची संततधार गती सुरु होती. नदीतल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हा ५० वर्षांचा उजीर्ण झालेला पूल वाहून गेले आहे.

मुरुड येथील काशीद पूल कोसळला; वाहतूक विस्कळीत
पुण्यातील मिलिटरी इंजिनरीग कॉलेजमध्ये कोसळला पूल

अलिबाग- मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवर असलेला हा जुना पूल कोसळले आहे. या मध्ये १ चार चाकी वाहन व १ मोटारसायकल सोबतच पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहे. या मध्ये १ मोटारसायकलस्वार पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती एकदरा या जवळील गावातील आहे. विजय चव्हाण असे या मृत व्यक्तीचे नाव आहे, अशी माहिती मुरूडचे नायब तहसिलदार रविंद्र सानप यांनी यावेळी दिली आहे. The Kashid bridge at Murud collapsed

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com