डॉक्टर उठला वकिलाच्या जीवावर, दात तोडत बेदम मारहाण

डॉक्टर उठला वकिलाच्या जीवावर, दात तोडत बेदम मारहाण
क्राईम न्यूज

कैलास चौधरी

उस्मानाबाद ः सराईत गुन्हेगारांमध्ये विविध कारणांवर नेहमीच वाद होत असतात. सर्वसामान्यांचीही भांडणं कोर्टात जातात. मात्र, उस्मानाबादमध्ये एक उच्चभ्रू डॉक्टरने वकिलांना बेदम मारहाण केलीय. बायकोचा खटला लढतो म्हणून या डॉक्टर महाशयांचा त्या वकिलांवर राग होता. त्या रागातूनच वकिलांच्या अंगावर डॉक्टरने मारेकरी घातले.

न्यायालयातील घटस्फोटाचा खटला सोडून दे असे म्हणत एका डॉक्टरने वकिलाला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अॅड. प्रथमेश मोहिते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे अक्षरशः दात तुटले आहेत. उस्मानाबाद येथील अॅड. प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी शहरातील डॉ. अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. The lawyer was injured in the attack by the doctor

क्राईम न्यूज
कोकणात पावसाचं थैमान, पाहा नदीचं हे रौद्ररुप

अॅड. प्रथमेश मोहिते हे घटस्फोट खटला लढण्यासाठी न्यायालयात हजर होते, त्यांच्यासोबत पक्षकार डॉ. कांचन मोरे ह्या देखील हजर होत्या. खटला संपल्यानंतर अॅड. प्रथमेश मोहिते स्वतःच्या गाडीने घराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कोर्टाच्या आवारात घटस्फोट खटल्यात प्रतिवादी असलेले डॉ. अरुण मोरे व त्यांचे दोन सहकारी अॅड. प्रथमेश यांना खटल्यातील वकीलपत्र मागे घे, असे सांगत धमकावत होते. मोहिते यांनी आरोपींना जुमानले नाही.

मोहिते हे घरी जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करीत त्यांच्यावर हल्ला चढवला. ह्या हल्ल्यात प्रथमेश मोहिते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल होताच डॉ. मोरे आणि साथीदार फरार झाले आहेत.The lawyer was injured in the attack by the doctor

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com