Video: 'अपंग आहे मी' म्हणत...!, चिमुकलीचा मदतीसाठी थेट बच्चू कडूंना फोन

दरम्यान मुंबईला येण्यासाठी आमच्याकडे पैसे नसल्याचा नयनांनी बच्चू कडू यांना सांगितलं.
Video: 'अपंग आहे मी' म्हणत...!, चिमुकलीचा मदतीसाठी थेट बच्चू कडूंना फोन
राज्यमंत्री बच्चू कडूSaam Tv

अमरावती: मी अपंग आहे तुम्हाला माहित नाही का असा थेट फोन सोलापुरातल्या एका चिमुकलीने राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना केला आहे. तिने बच्चू कडूंना आपल्या समस्या सांगितल्या आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं असून तिला बच्चू कडू यांनी मुंबईला भेटण्यासाठी बोलावले आहे.

दरम्यान मुंबईला येण्यासाठी आमच्याकडे पैसे नसल्याचा नयनानी बच्चू कडू यांना सांगितलं. दरम्यान तुझा अकाउंट नंबर दे तुझ्या खात्यात पैसे टाकून देतो आणि त्या पैशाच तिकीट काढून मुंबईला ये असं कडू म्हणाले संवादाचा व्हिडिओ बच्चू कडू यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू
सांगलीत आमिर खानला अटक; रेमडेसिव्हरचा काळाबाजार भाेवला

राज्यमंत्री बच्चू कडू हे प्रवास करत असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नैना झोकाळ या दिव्यांग असलेल्या चिमुकल्या मुलीने राज्यमंत्री बच्चू कडू यांना मदतीसाठी फोन केला. बच्चू कडूं समोर तिने आपली व्यथा मांडली मग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शांततेत तिच्या मागण्याया विचारात घेतल्या, दरम्यान तुम्ही मुंबईला या तुम्हाला नक्कीच मदत करू असे आश्वासन बच्चू कडू यांनी तिला दिलं आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com