युवकाच्या प्रसंगावधानाने 2 मोटारसायकल स्वारांचे वाचले प्राण

थोड्या पावसात या पुलावर पाणी येऊन रस्ता वाहतुकीस बंद होतो. या रस्त्यावर आठ गावे असल्याने या गावांचा संपर्क बंद होतो.
युवकाच्या प्रसंगावधानाने 2 मोटारसायकल स्वारांचे वाचले प्राण
युवकाच्या प्रसंगावधानाने 2 मोटारसायकल स्वारांचे वाचले प्राण राजेश काटकर

परभणी: पाण्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकल सह वाहुन जाणाऱ्या दोन युवकांचे प्राण एका युवकाने प्रसंगावधान दाखवल्याने वाचविले. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव जवळील उक्कडगाव रस्त्यावर फाल्गुनी नदीवर असलेल्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

थोड्या पावसात या पुलावर पाणी येऊन रस्ता वाहतुकीस बंद होतो. या रस्त्यावर आठ गावे असल्याने या गावांचा संपर्क बंद होतो. पाणी कमी झाले की नागरीक या रस्त्यावरुन आपल्या गाड्या घालतात. पण पुलावर दोन्ही बाजुंनी पडलेल्या मोठ्या खड्यामुळे गंभीर अपघात होत असतात. दि.१३ रोजी या पुलावरुन पाणी वाहत असतांना एका मोटारसायकल स्वाराने आपली मोटार सायकल पुरातील पाण्यात घातली पण मोटारसायकल खड्यात अडकल्याने त्याने ती सहकाऱ्याच्या मदतीने काढण्याचा प्रयत्न केला. पण खड्डा व पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे ही जण मोटार सायकल सह वाहुन जाऊ लागले.

युवकाच्या प्रसंगावधानाने 2 मोटारसायकल स्वारांचे वाचले प्राण
शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड; विदर्भात एकही मंत्री नसल्याने नेते नाराज

तिथे उपस्थित असलेल्या वेदांत देशपांडे या युवकाच्या लक्षात ही बाब तात्काळ लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान दाखवत. ताबडतोब धाव घेऊन वाहुन जाणाऱ्या व्यक्तींना हात देऊन सावरले व त्याच्या मदतीने मोटारसायकल व तिच्यावरील दोन्ही स्वारांन बाहेर काढले. मोटारसायकल वरील एक युवक मोटारसायकल खाली अडकल्याने मोठी गंभीर स्थिती निर्माण झाली होती.

पण वेदांत देशपांडे याच्य समय सुचकते मुळे तीन व्यक्ती व मोटारसायकल वाचली .त्याच्या या धाडसाबद्दल व समयसुचकते साठी परीसरात त्याचे कौतुक होत आहे. फाल्गुनी नदीवरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी नागरीकातुन होत आहे. तसेच पाणी असल्यावर त्या धोकादायक पुलावरुन नागरीकांनी वागु नये असे आवाहान करण्यात येत आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com