माझी पत्नी राजश्रीला वहिनी साहेब म्हणू नका- धनंजय मुंडे

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत मजबूत....विरोधकांचे सर्व डाव परतवून लावण्याची ताकत - धनंजय मुंडे
माझी पत्नी राजश्रीला वहिनी साहेब म्हणू नका- धनंजय मुंडे
माझी पत्नी राजश्रीला वहिनी साहेब म्हणू नका- धनंजय मुंडेSaam Tv

बीड : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत मजबूत स्थितीत आहेत. राज्याचे पूर्वी मुख्यमंत्री व मंत्री राहिलेले अनुभवी या सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे विरोधकांचे सर्व डाव परतवून, लावण्याची ताकत महाविकास आघाडी मध्ये आहे. विरोधकांना सर्व प्रकारे तोंड द्यायला आम्ही सक्षम आहोत, असे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. मुंडे कुटुंबियांच्या वतीने परळी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांसाठी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.

हे देखील पहा-

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, परळी नगर पालिकेची निवडणूक लागली, तर समोरच्याना उमेदवार देखील मिळणार नाही. मात्र, इथे महाविकास आघाडी म्हणून लढताना समोरच्या विरोधी पक्षाला प्रत्येक वॉर्डात उमेदवार व बूथ वर माणसे देण्याची सुद्धा पंचाईत आहे. असा खोचक टोला नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगवला आहे. परळी नगर पालिका ही आपल्यासाठी केवळ एक सत्ता केंद्र नसून, इथल्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचे ते एक माध्यम आहे. मी माझी स्वतःची विधानसभेची निवडणूक जितकी गांभीर्याने लढलो, त्यापेक्षा नगर पालिकेची निवडणूक अधिक गांभीर्याने लढणार आहे, असे देखील ते म्हणाले आहेत.

माझी पत्नी राजश्रीला वहिनी साहेब म्हणू नका- धनंजय मुंडे
नवाब मलिक यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांचे उत्तर

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी मंत्री काय झालो, धनु चा भाऊ झालो आणि मंत्री झाल्यानंतर धनुभाऊ चा साहेब झालो? मी आणखीन भाऊच आहे पण राजश्री वहिनी झाली आणि वहिनीची वहिणीसाहेब झाली पण कृपा करून, माझ्या बहिणीला ताई साहेब म्हणून बोलतात पण माझ्या पत्नीला वहिनी साहेब म्हणून बोलू नका, कारण मी आणखी धनु भाऊच आहे. असा खोचक टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

दरम्यान मागील काळात कोविडमुळे व त्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या निर्बंधांच्या काळात अनेक सण- उत्सव नागरिकांना आपापल्या घरात बसून साजरे करावे लागले आहेत. पण यापुढे कोविड नसेल, तर दिवाळी स्नेहमिलनाचा हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करू, असेही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी उपस्थितांना दीपावली व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Edited By- digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com