मुळा धरण काठोकाठ, पन्नास वर्षांत भरले ३२वेळा

Mula Dam
Mula DamSaam Tv

अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरण रविवारी धरण परिचलानुसार २६,००० दशलक्ष घनफुट (शंभर टक्के) काठोकाठ भरण्यात आले. धरण भरण्याचे यंदाचे सलग चौथे वर्ष आहे. मागील ५० वर्षांत ३२ वेळा धरण भरले.

मुळा धरणात १९७२ साली पाणी साठविण्यास सुरुवात झाली. यंदाचे ५० वे वर्ष असल्याने माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी धरणाच्या दरवाजांवर तिरंगी प्रकाशझोत टाकले. त्यामुळे धरणाची शोभा वाढली.

आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजता धरणातून दरवाजांद्वारे मुळा नदीपात्रात १०८५ क्युसेकने जायकवाडी धरणासाठी विसर्ग सुरु होता. यंदाच्या वर्षी धरणात आजपर्यंत २२ हजार ९७९ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले. यंदा मुळा धरणातून दरवाजांद्वारे मुळा नदीपात्रात २३०८ दशलक्ष घनफूट, उजवा कालव्याद्वारे ७४५ दशलक्ष घनफूट, तर डावा कालव्याद्वारे २०८ दशलक्ष घनफूट असे एकूण ३२६१ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी सोडले. The Mula dam has been filled 32 times in 50 years

Mula Dam
रोहित पवार म्हणतात, यामुळेच कर्जत-जामखेडकरांचा अभिमान वाटतो

धरणाच्या उजवा कालव्याद्वारे राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगांव तालुक्यातील ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होते. डावा कालव्याद्वारे राहुरी तालुक्यातील १० हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होते. असे एकूण ८३ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाण्याचा लाभ होतो.

त्याव्यतिरिक्त वांबोरी उपसा योजनेद्वारे धरणातून ६८० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. या योजनेच्या आराखड्यानुसार राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील ४३ गावांमधील १०२ तलावांमध्ये पाणी देण्याचे नियोजन आहे. त्याच्या ३५६८ हेक्टर क्षेत्राला अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होतो. प्रत्यक्षात वांबोरी योजनेद्वारे ४२ पैकी ३९ गावांमधील ७५ तलावांमध्ये पाणी पोचते. भागडा चारीद्वारे धरणातून ६० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. त्याद्वारे राहुरी तालुक्यातील अकरा तलावांमध्ये पाणी सोडले जाते.The Mula dam has been filled 32 times in 50 years

औद्योगिक वसाहतींची चिंता मिटली

औद्योगिक क्षेत्रात नगर, पांढरीपूल (ता. नेवासा), सुपा (ता. पारनेर) येथील औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा केला जातो. त्याव्यतिरिक्त थेट धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी नगर महानगरपालिका, मिरी-तिसगांव, बुऱ्हाणनगर, करजगांव-सोनई योजना, बारागांव नांदूर, कुरणगांव, देवळाली प्रवरा पालिका व राहुरी पालिका पाणी योजनांद्वारे पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. यंदा धरण भरल्याने आगामी वर्षभर पाण्याची चिंता मिटली आहे.

सिंचनासाठी १६ हजार दशलक्ष घनफूट पाणी

यंदाच्या वर्षी १६ हजार दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. उजवा व डावा कालव्याद्वारे चार आवर्तने मिळण्याची शक्यता आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचनाच्या पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष कालवा समितीच्या बैठकीकडे लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com