ओबीसींच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची निदर्शने

केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी.
ओबीसींच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची निदर्शने
ओबीसींच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची निदर्शनेSaamTV

चंद्रपूर : ओबीसींच्या (OBC) विविध मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने चंद्रपूर जिल्हाधिकारी (Chandrapur Collectorate) कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली आहेत. केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी तसेच घटनेत सुधारणा करुन ओबीसी संवर्गाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतमधे लोकसंख्येच्या प्रमाणात अथवा २७ टक्के राजकिय आरक्षण (Political Reservation) राहील, अशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पुढे रेटण्यात आली. (The National Federation protested for the demands of OBCs)

हे देखील पहा -

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जी ५० टक्केची आरक्षणाची मर्यादा आखुन दिली आहे, ती केंद्र सरकारने हटवावी व ओबीसींना पूर्णत: न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. केंद्र सरकारने ओबीसींची २७ टक्के पदभरती करुन रोहिणी आयोग लागू करावा, केंद्र सरकारने ओबीसींना पदोन्नतीचा लाभ द्यावा, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com